Fake IAS officer in Pune: पुण्यातून एका तोतया आयएएस अधिकाऱ्याला चतुर्श्रुंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News) पुण्यातील एका कार्यक्रमात या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वासुदेव निवृत्ती तायडे असे हा व्यक्तीचे नाव असून तो तळेगाव दाभाडे येथील नागरिक आहे. ( Fake IAS officer arrested by Pune police)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंधमध्ये पुणे (Pune Police) बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाच्या वेळी वासुदेवने आपले नाव डाॅ. विनय देव असे सांगत आपण आय. ए. एस. यापदावर असून सध्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्राेटरी या पदावर असून आपण गाेपनीय कामेही करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता, सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Crime news)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.