Sudha Murty : 'इन्फोसिस'च्या सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

Sudha Murty Nominated to Rajya Sabha : सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
Sudha Murty
Sudha MurtySarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha News : इन्फोसिस फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांचे औद्योगिक जगतात मोठे नाव आहे. इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अशी त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत.

कोण आहेत सुधा मूर्ती ?

सुधा मूर्ती यांची सामाजिक कार्य आणि लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस संस्थेचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती (N R Narayan Murty) यांच्या त्या पत्‍नी आहेत. सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

सुधा मूर्ती यांचा जन्म 19 मे 1950 ला कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या सुधा मूर्ती यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई केले आहे. त्या टाटा ग्रुपच्या (Tata Group) पहिला महिला इंजिनिअर होत्या.

सुधा मूर्ती यांनी लिहिलेली काही खास पुस्तके -

  • अस्तित्व

  • आजीच्या पोतडीतील गोष्टी - अनुवादीत

  • आयुष्याचे धडे गिरवताना

  • द ओल्ड मॅन अँड हिज गॉड (इंग्रजी)

  • कल्पवृक्षाची कन्या: पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री, मराठी अनुवाद

  • जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)

  • डॉलर बहू (इंग्रजी)-(मराठी)

  • थैलीभर गोष्टी

  • परिधी (कानडी)

  • परीघ (मराठी)

    R

Sudha Murty
Modi Guarantee News: मोदी सरकारची नुसतीच गॅरंटी नाही, तर महिलांना केले आर्थिकदृष्ट्या सक्षम !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com