Loksabha Election 2024 News : देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 48 ते 50 टक्के महिला मतदार आहेत आणि या मतदारांना कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडण्याच्या तयारीत नाही. अगदी ट्रिपल तलाक रद्द करण्यापासून ते गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी करेपर्यंत अनेक निर्णय हे महिलांना केंद्रित ठेवून घेण्यात आले आहेत.
इतक्यावर मोदी सरकार थांबले नाही तर लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचे सूतोवाच मोदी सरकारने केले आहे. यापेक्षा अनेक मोठे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत.
त्यात ट्रिपल तलाक रद्द करण्यासारखा सामाजिक मोठा निर्णय महत्त्वाचा आहेच. त्याचबरोबर कोट्यवधी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करत उद्योजक करण्याचे मोदी सरकारचे धाडस वाखाणण्याजोगी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घरगुती गॅसचे दर शंभर रुपयांनी कमी करत दिलेले आजचे हे गिफ्ट हे केवळ निवडणुकीपुरतेच आहे, की भविष्यातदेखील त्याचा विचार होईल हे पाहण्यासारखे ठरेल. आज जागतिक महिलादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी, गृहिणींसाठी धोरणात्मक निर्णय घेतला.
उज्ज्वला योजनेतून कोट्यवधी महिलांना देण्यात येणारे सिलिंडर त्याच बरोबर शंभर रुपयांची दिलेली सूट ही निवडणूक काळातील मोठी घटना मानावी लागेल. गेल्या काळात नारीशक्ती वंदन अधिनियम याअंतर्गत लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना दिली आहे.
देशात 50 टक्के महिला असताना 33% ची हमी हादेखील महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न मानावा लागेल. विशेषतः महिला राजकारण्यांसाठी सुखावणारा हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. (Modi Guarantee News)
महिला बचत गटासाठी तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याची केंद्र सरकारची योजना ही महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोठा आधार आहे. मोदी सरकारच्या काळात गर्भवती महिलांना देण्यात येणाऱ्या सुट्टीत वाढ करण्यात आली. महिलांना बाल संगोपनासाठी सरकारद्वारे दिल्या जाणारी ही सुट्टी निश्चितच महिला सक्षमीकरण आणि मातृत्व जपण्याचे मोठे पाऊल केंद्र सरकारने (Central Government) उचलले आहे.
आजही अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. महिला राजकारणी, महिला प्रशासकीय अधिकारी, सैन्य दलातील महिलांचे सक्षमीकरण, प्रजासत्ताकदिनी महिलांच्या नेतृत्वात झालेले संचलन आणि महिला वैमानिकांनी दाखविलेले साहस हे महिलांच्या सक्षमीकरणाचे मोठे पाऊल मानावे लागेल.
अॅनिमियामुक्त भारत अभियानात मोदी सरकारने गर्भवती महिलांवर फोकस करत त्यांना दर्जेदार आहार, औषधांचा पुरवठा केला. याचा लाभ देशभरातील लाखो महिलांना झाला. देशात आॅलिंम्पिकमध्ये सहभागासाठी शंभरावर महिला खेळाडूंना विविध आर्थिक भत्ते केंद्र सरकारमार्फत देण्यात येत आहे. इतक्यावर मोदी सरकार थांबले नाहीत, तर त्यांनी ड्रोन पायलट ही योजना महिलांसाठी खास सुरू केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महिलांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी मोदी सरकारने महिलांसाठी विशेष मोहिम राबविली. इतक्यावर मोदी सरकार थांबले नाही तर त्यांनी कोट्यवधी महिलांना कोट्यवधी रक्कम उद्योगासाठी सहज उपलब्ध करून दिली.
MSME च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मोठे करण्यात मोदी सरकारचा सिंहाचा वाटा आहे. फक्त महिलांसाठी उद्यम अंतर्गत आणि उद्यम असिस्टंट पोर्टल अंतर्गत मोदी सरकारने एक कोटी 40 लाख महिलांचे रजिस्ट्रेशन करत त्यांना हवे ते अर्थ साह्य उपलब्ध करून दिले.
सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत 17 लाख महिलांना 83 हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. यातून विविध क्षेत्रात त्यांनी उद्योग उभारणा करत स्वतःबरोबर परिवाराचे आर्थिक समक्षीकरण केल्याचे लाखो उदाहरण समोर आले आहे. आंध्र प्रदेशातील महिला उद्योजकांनी घेतला.
आंध्र प्रदेशात सुमारे तीन लाख महिलांनी जवळपास चार हजार कोटींचे कर्ज घेत उद्योग उभारणी केली. तमिळनाडू (Tamil Nadu) येथील पावणेदोन लाख महिलांनी सुमारे साडेसात हजार कोटींचे कर्ज घेतले. उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी सव्वा लाख महिलांनी या योजनांचा फायदा घेतला, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साठ हजार कोटींचे कर्ज 80 हजार महिलांना या योजनेत प्राप्त झाले.
मोदी सरकारने महिलांच्या समक्षीकरणासाठी उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे स्वयंरोजगारात महिलांनी अग्रेसर होत इतरांना रोजगार देण्याचा जोरदार प्रयत्न मोदी सरकारच्या काळात झाल्याचे चित्र आहे. महिलांच्या तीन लाख प्रोजेक्टमध्ये 9 हजार कोटींचा मार्जिन मनी मोदी सरकारने दिला.
आज केवळ गृहिणींच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर शंभर रुपयांनी कमी केल्याचे चित्र डोळ्यांसमोर येत असताना अशा अनेक योजना मोदी सरकारने महिलांसाठी राबविल्या ज्याचा थेट फायदा हा महिलांना झाला आणि त्यांचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. इतक्यावर मोदी सरकार थांबले नसून त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत कार्य सुरू केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेत (Pmay) महिलांच्या नावावर मोदींच्या (Narendra Modi) कल्पनेतून घर देण्यात आले. याचा फायदा कोट्यवधी परिवारांना झाला आहे. मोदींची नुसतीच गॅरंटी हा शब्द न राहता महिलांच्या सक्षमीकरणात तो मैलाचा दगड ठरला आहे.
(Edited By : Sachin Waghmare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.