
चंदीगड : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन करून काही अटींवर भाजपसोबत जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्यावरही ते सातत्याने टीका करत आहेत. आता काँग्रेसनंही अमरिंदरसिंग यांच्या अडचणीत वाढवल्या आहेत.
अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानमधील महिला पत्रकार अरूसा आलम (Aroosa Alam) यांच्याशी अनेक वर्षांपासून मैत्री आहे. पण अरूसा यांचा पाकिस्तानाची (Pakistan) गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयशी (ISI) संबंध असल्याचा थेट आरोप खुद्द गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अरूसा आलम यांची याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले जातील, असे रंधावा म्हणाले आहेत. त्यामुळे अमरिंदरसिंग यांच्या अडचणी वाढणार आहेत.
माध्यमांशी बोलताना रंधावा म्हणाले, रंधावा म्हणत आहेत की पंजाबला आयएसआयपासून धोका आहे. त्यामुळे आम्हीही अरूसा आलम यांचे आयएसआयशी काय कनेक्शन आहे, याचा शोध घेऊ. अमरिंदरसिंग हे पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनचा मुद्दा उपस्थित करत असतात. त्यांनी आधी हा मुद्दा उपस्थित केला आणि नंतर पंजाबमध्ये बीएसएफ आणलं. त्यामुळे हा मोठ्या षडयंत्राचा भाग वाटतो, त्याची चौकशी व्हायला हवी.
पंजाब काँग्रेसकडून अमरिंदरसिंगं यांच्यावर करण्यात आलेला हा पहिलाच गंभीर आरोप आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमरिंदरसिंग यांच्याकडून सिध्दूंवर सतत टीका केली जाते. त्यांच्यापासून पंजाबला धोका असल्याची टीका ते करतात. आता त्यांच्यावर पाकिस्नान कनेक्शनचा थेट आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे यावरून अमरिंदरविरूध्द काँग्रेस हा वाद आणखी चिघण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करू उतरणार असल्याचे अमरिंदरसिंग यांनी जाहीर केलं आहे. मागील वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास भाजपसोबत आघाडी करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यावरून काँग्रेसने अमरिंदरसिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. अद्याप अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.