BJP and Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने विविध राज्यातील राज्य महिला प्रभारी आणि सह-प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठीही चार महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचा समावेश आहे.
सुलक्षणा सावंत(Sulakshana Sawant) यांची महाराष्ट्राच्या सह-प्रभारीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे सुलक्षणा सावंत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासह रणनिती ठरविण्यासाठी सक्रियपणे काम करताना दिसतील. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गोव्याचे महिला राज्यप्रभारीपदही आहे.
महाराष्ट्रात माया नारोलिया या प्रभारी म्हणून काम पाहतील. याशिवाय आश्विनी एम. एल, शांथिला भट्ट आणि सुलक्षणा सावंत सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी सुलक्षणा सावंत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप उमेदवारांचा प्रचार करताना दिसून आल्या होत्या. व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या सुलक्षणा सावंत यावेळी महाराष्ट्रात भाजपसाठी(BJP) सक्रियपणे काम करताना दिसून येतील.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यात सावंत यांनी प्रचारसभांना संबोधित केले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्याकडे देखील भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यातील प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मुख्यमंत्री सावंत भाजपच्या अनेक महत्वाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसून आले होते. त्यापैकी अनेक उमेदवार विजयी देखील झाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.