Chief Minister Atishi and Kejriwal : मुख्यमंत्री आतिशी अन् केजरीवालांना समन्स ; भाजप नेत्याने दाखल केला होता खटला!

Summons to Atishi and Kejriwal : ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे समन्स राउज एव्हेन्यू कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
Chief Minister Atishi and Kejriwal
Chief Minister Atishi and KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह अन्य एकास त्यांच्याविरोधात दाखल मानहानी प्रकरणात ३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे समन्स राउज एव्हेन्यू कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावले आहे. न्यायालय आता या तारखेला आरोपांवरील युक्तिवादवरही विचार करेल.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तान्या बामनियाल यांनी आरोप आणि आरोपींच्या उपस्थितीवरील युक्तिवादासाठी प्रकरण ३ ऑक्टोबर रोजी लिस्टेड केले आहे. भाजप नेते राजीव बब्बर यांनी वर्ष २०२०मध्ये आम आदमी पार्टीच्या(AAP) नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात ट्राय कोर्टाच्या कार्यवाही विरोधात अपील फेटाळले होते.

Chief Minister Atishi and Kejriwal
Bhupendra Hooda : भूपेंद्र हुड्डांवर काँग्रेसच्याच नेत्याने केला विश्वासघाताचा आरोप; थेट 'हायकमांड'ला कळवत पक्षही सोडला!

बब्बर यांनी केजरीवाल आणि अन्य आप नेत्यांवर भाजपला बदनाम करण्याचा आरोप केला होता. त्यांचा आरोप होता की, दिल्लीच्या मतदार यादीतून एकूण ३० लाख मतदारांचे नाव हटवण्यास भाजप(BJP) जबाबदार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने बनिया, मुस्लिम आणि अन्य समुदायांच्या लोकांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये उच्च न्यायालायने केजरीवाल आणि अन्य आप नेत्यांविरोधात मानहानी प्रकरणात कार्यवाहीला स्थगिती दिली होती.

Chief Minister Atishi and Kejriwal
Shyam Rajak : लालूंना झटका देत पुन्हा 'JDU'मध्ये आलेल्या श्याम रजक यांना नितीश कुमारांकडून मोठी जबाबदारी!

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी मोठी घोषणा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Kejriwal ) यांची खुर्ची तशीच ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com