Pradeep Sharma Grants Bail : अँटिलिया स्फोटके प्रकरण : प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

Supreme Court News : प्रदीप शर्मा यांच्या वतीने मुकुल रोहोतगी यांनी बाजू मांडली.
Pradeep Sharma
Pradeep SharmaSarkarnama

New Delhi : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रदीप शर्मा यांच्या वतीने मुकुल रोहोतगी यांनी बाजू मांडली.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने (NIA) सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता या प्रकरणी शर्मा यांचा सहभाग असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले होते.

शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात किंवा अन्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे न्यायालयाने शर्मा यांना यापूर्वी जामीन नाकारताना न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Pradeep Sharma
Central Government News : सीबीआय अन् ईडीच्या समन्वयासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल ; CIO च्या प्रमुखपदी संजय मिश्रा...

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर एक एसयूव्ही सापडली होती. त्यात स्फोटके आढळली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. या प्रकरणात सचिन वाझे याचे नाव समोर आले होते. सचिन वाझे याने शर्मा यांना हत्येसाठी 45 लाख रुपये दिल्याचेही एनआयएने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com