Supreme Court News : निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात; मोदी सरकारची कोंडी?

Arun Goel Resigns : अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली जात आहे.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरूण गोयल यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मतभेदामुळे गोयल यांनी राजीनामा दिल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोन्ही निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त असल्याने राजीव कुमार यांच्यावर मोठा भार असल्याने ही पदे केंद्र सरकार लवकर भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते. पण त्याआधीच याविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court News) याचिका दाखल करण्यात आली आहे

काँग्रेसच्या (Congress) नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त पदांवर नियुक्ती करण्यापासून सरकारला रोखावे, अशी मागणी ठाकूर यांनी याचिकेत केली आहे. त्यामुळे आता त्यावर कोर्टाकडून काय निकाल दिला जाणार, याकडे सरकारसह सर्वच राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

Supreme Court
Lok Sabha Election 2024 : भाजप खासदाराला भिडणार घटस्फोटित बायको; ही लढत कुठे रंगणार?

निवडणूक आयुक्तांच्या (Election Commissioner) नेमणुकीबाबत केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नवीन कायदा आणला आहे. ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023’ या कायद्यामुळे संबंधित आयुक्तांच्या नियुक्ती करणाऱ्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. या कायद्यालाच आव्हान देणाऱ्या याचिका यापूर्वी सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरुण गोयल (Arun Goel) यांनी 9 मार्चला निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्याआधीच गोयल यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, दोन नवी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केंद्र सरकारकडून 15 मार्चपुर्वी केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयुक्तांची दोन्ही पदे रिक्त असल्याने सरकारसाठी ही नामुष्की ठरू शकते. पण आता ठाकूर यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे नव्या नियुक्तीतही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Supreme Court
Electoral Bond Update : 26 दिवस काय केलं? SBI ला ‘सुप्रीम’ दणका; मुदतवाढीच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com