Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'मधील विंग कमांडर सुचेता यांना 'सुप्रीम' दिलासा; पदावरून न हटविण्याचे आदेश

Supreme Court Commends Armed Forces’ Discipline and Dedication : विंग कमांडर सुचेता एडन यांनी केंद्र सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांना हवाई दलामध्ये परर्मनन्ट कमिशन नाकारण्यात आले आहे.
Supreme Court, Operation Sindoor
Supreme Court, Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

Background on Wing Commander Sucheta Edn’s Plea : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त केले. याच ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विंग कमांडर सुचेता एडन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

विंग कमांडर सुचेता एडन यांनी केंद्र सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांना हवाई दलामध्ये परर्मनन्ट कमिशन नाकारण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची सेवा समाप्त होणार होती. हवाई दलाच्या या निर्णयाविरोधात यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सुचेता एडन यांनी आपण ऑपरेशन सिंदूर, बालाकोटसह महत्वाच्या मोहिमांचा भाग असल्याचा दावा याचिकेत केला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडली. संबंधित महिला अधिकाऱ्यांना बोर्डाने अयोग्य ठरवले होते. लष्करामध्ये तरूणाई असायला हवी, असा तर्क त्यामागे देण्यात आला होता. तुलनात्मक योग्यतेचा प्रश्न असल्याचे भाटी यांनी कोर्टात सांगितले होते.

Supreme Court, Operation Sindoor
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई ED च्या कारवायांवर संतापले; थेट मर्यादाच काढली...

सुनावणीदरम्यान भाटी यांनीही भारतीय लष्कराच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यावर आपले हवाई दल सर्वश्रेष्ठ आहे, यात काहीच शंका नाही. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले. लष्कराने ज्याप्रकारे समन्वय दाखवला आहे, तो बिनतोड आहे. त्यामुळे आपण त्यांना नेहमी सलाम करतो, असेही त्यांनी सांगितले.

Supreme Court, Operation Sindoor
Death Certificate : तहसीलदाराचा प्रताप, थेट जिल्ह्याचेच मृत्यू प्रमाणपत्र केलं जारी; काही तासांत निलंबन...

केंद्र सरकारला आदेश देताना न्यायाधीश सूर्यकांत यांनी विंग कमांडर सुचेता यांना तात्पुरता दिलासा दिला. त्यांना काही कालावधीपर्यंत काम सुरूच ठेवण्याची परवानगी दिली जावी. त्यांच्या अधिकारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही तसेच कोणत्याही अटींशिवाय त्यांना पदावर राहण्याची परवानगी दिली जावी, असे कोर्टाने म्हटले आहे. याबाबत केंद्राला नोटीस जारी करण्यात आली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com