Ram Temple Fund Scam : राम मंदिर निधी कथित अपहार प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ट्रस्टच्या अडचणी वाढल्या

Supreme Court seeks SIT report, issues notice to Ram Temple Trust : राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीतील कथित अपहाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाला स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Ayodhya Ram Mandir Fund
Ayodhya Ram Mandir FundSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir Fund : अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीतील कथित अपहाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचे निर्देश दिले.

उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) स्थिती निदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाशी संबंधित विविध याचिकांवर (Court) सुनावणी झाली. याचिकांमध्ये निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

सीबीआयमार्फत (CBI) चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्यामार्फत लेखापरीक्षण करण्याचीही मागणी केली आहे. अजयकुमार राय आणि दिनेशकुमार यादव यांनीही अशाच स्वरूपाची याचिका दाखल केली आहे.

Ayodhya Ram Mandir Fund
BJP And Ram Mandir Controversy : राम मंदिर देणगी घोटाळ्यात ट्विस्ट; भाजप नेत्याचाच गंभीर दावा, ‘चंपत राय यांच्यासह तिघांना होऊ शकतो तुरुंगवास’

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह यांनी स्वतंत्र याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी तसेच ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

Ayodhya Ram Mandir Fund
Ram Mandir FIR : अयोध्येतील राम मंदिरात देणगी अपहारप्रकरण; ‘श्रीराम ट्रस्ट’ची मोठी कारवाई; 8 जणांविरोधात FIR दाखल

दरम्यान, राम मंदिरातील देणगी व्यवस्थापनाशी संबंधित कथित अनियमिततेच्या तपासासाठी नियुक्त एसआयटी लवकरच ट्रस्टशी संबंधित व्यक्तींची चौकशी करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. देणगी व्यवस्थापनाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी पुन्हा अयोध्याला भेट देण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

राम मंदिराला देणगी स्वरूपात मिळालेल्या रोकड आणि मौल्यवान वस्तूंच्या कथित अपहाराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश सरकारने 13 जून रोजी लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. या पथकाने 23 जून रोजी प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर १ जुलै रोजी तपास पूर्ण करण्यासाठी एसआयटीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढविण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com