Devendra Fadnavis : काँग्रेसला CM फडणवीसांनी धू धू धुतले; म्हणाले, 'मोदी अन् शाह स्वप्नात...' पाहा VIDEO

Gadchiroli Guardian Minister Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद काँग्रेसच्या राजकारणावर जोरदार टीका केली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली पत्रकार परिषद होमटाउन नागपूर इथं घेत काँग्रेसच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला.

'ईव्हीएम', भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि वीर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावरून काँग्रेस करत असलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा फेक नॅरेटीव्ह तोडण्यात यश आले. संविधानावरून लोकसभेत हा नॅरेटीव्ह तयार करण्यात आला होता. आम्ही तिघही एकत्रच काम करतो. वन-डे खेळून चालणार नाही, म्हणून आम्ही 20-ट्वेंटी मॅच खेळलो. त्यात जिंकलो. परंतु आता कसोटी खेळावी लागणार असून, ही मॅच ड्रा होऊन देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Sanjay Raut : 'लाडक्या बहि‍णीं'चे सत्ताधारी भाऊ राज्याला दारूडा करणार; DCM पवारांचा 'तो' निर्णय दुर्दैवी ठरेल, राऊतांचा हल्लाबोल

ईव्हीएम (EVM) हे हॅक होऊ शकत नाही, हे काँग्रेसला चांगले माहिती आहे. आतापर्यंत ईव्हीएम हॅक करणाऱ्यांचे अनेक चॅलेंज समोर आले. परंतु त्यात यश आलेले नाही. काँग्रेसचे राजकारण असे आहे की, जिंकल्यावर लोकशाही जिंकली असे म्हणते, आणि हारल्यावर ईव्हीएमला दोष देते. त्यांचेच सहकारी अब्दुल्ला आणि ममता यांनी काँग्रेसला ईव्हीएमला शिव्या बंद करण्याचा सल्ला दिल्याकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष वेधले.

Devendra Fadnavis
Maharashtra Congress : काँग्रेससमोरचं मोठं आव्हान; प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला भिडणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा शोध...

काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला आहे. त्यांना निवडणूक आणले नाही. महापरिनिर्वाणानंतर स्मारकासाठी जागा दिली नाही. आंबेडकरांना भारतरत्न काँग्रेसने दिलेले नाही. आंबेडकरांचे स्मारकं हे भाजपने विकसित केलीत. काँग्रेसला नेहमीच वाटते की, नेहरू आणि गांधी परिवारापेक्षा कोणीही मोठे होऊ नये, यासाठी त्यांनी आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला आहे.

अमित शाह यांचा व्हिडिओ काँग्रेसने व्हायरल केला

"राष्ट्रीय पक्ष असून, संसदेतील अमित शाह यांचा व्हिडिओ एडिट करून, त्यावर देशात अस्थिरता निर्माण करत आहे. जातीय वातावरण गढूळ करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे स्वप्नात देखील आंबेडकर यांचा स्वप्नात देखील अपमान करू शकत नाही. पराभवामुळे काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ती जमीन मिळवण्यासाठी काँग्रेस काहीही करत आहे", असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सायबर गुन्ह्यांवरून फडणवीसांचा इशारा

"सायबर गुन्हे मोठं आव्हान आहे. तंत्रज्ञान वेगानं बदलत आहे. पण नालायक, दृष्ट लोकं याच तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म राज्यात सुरू करत आहोत. यामुळे सायबर गुन्हे वेगानं उघडकीस आणू शकतो, असे सांगताना विधानसभेतील भाषणाचा संदर्भ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. नक्षलवादी संविधान मानत नाही, असे मी म्हटलो होतो. पण, त्यातील नक्षलवादी हा शब्द काढून टाकून माझा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. पण अशी एखादी गोष्ट समाज माध्यमांवर शेअर केल्यावर त्याचा डिजिटल फूटप्रिंट आपण शोधू शकतो", असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com