Electoral Bond : निवडणूक रोखे कुणाला आणणार अडचणीत; सरन्यायाधीश चंद्रचूड दुसरा घाव घालणार?

Supreme Court on Electoral Bond : निवडणूक रोख्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी अनेक याचिकांद्वारे करण्यात आली आहे. त्यावर 22 जुलैला सुनावणी होणार आहे.
Electoral Bond, Supreme Court
Electoral Bond, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi :  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची निवडणूक रोखे योजना रद्द करत मोठा झटका दिला होता. त्यानंतर विरोधकांची त्याचे भांडवल करत निवडणुकीत जोरदार प्रचार केला. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. आता निवडणुकीनंतरही हे रोखे भाजपची पाठ सोडताना दिसत नाही.

निवडणूक रोख्यांची विशेष तपास पथक म्हणजे SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली होती. त्यानुसार कोर्टानेही सोमवारी (22 जुलै) त्यावर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Electoral Bond, Supreme Court
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल

सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी पारदीवाला व न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थांनी याचिका दाखल कल्या आहेत. त्यामध्ये अनेक राजकीय पक्षांना शेल कंपन्या तसेच तोट्यात चाललेल्या कंपन्यांकडून निधी मिळाल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक रोखे योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्याचा तपास केवळ सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखालीच होऊ शकतो. सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या घोटाळ्यात कंपन्यांचे, सरकारी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी असू शकतात. त्याचप्रमाणे ईडी, सीबीआय, आयटी सारख्या तपास यंत्रणांचेही अधिकाही षडयंत्राचा भाग असू शकता, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Electoral Bond, Supreme Court
Video Police Lathi Charge : पोलिसांचा पोलिसांवरच लाठीचार्ज; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर राडा

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी महिन्यात ही योजना रद्द करण्याचा आदेश दिला होता. तसेच रोख्यांची माहिती प्रसिध्द करण्याची आदेश स्टेट बँक ऑफ इंडिया आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. ही माहिती प्रसिध्द झाल्यानंतर भाजपला सर्वाधिक रोख्यांतून निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com