MNS News : राष्ट्रवादी भाजपची बी टीम ; अदानी प्रकरणावरुन मनसेचा गंभीर आरोप

MNS attacks Sharad Pawar : पवारांच्या विधानावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Sandeep Deshpande ,  Sharad Pawar
Sandeep Deshpande , Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

MNS attacks Sharad Pawar over Gautam Adani case : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात रान उठवण्याची जय्यत तयारी काँग्रेसने केली आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यापेक्षा आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. पवाराच्या या विधानामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसलाही 'खो' दिलाच्या चर्चा आहे.

पवारांनी केलेल्या या विधानामुळे दोन दिवसापासून शरद पवार हे समाज माध्यमांवर ट्रेंड होत आहेत. अदानी प्रकरणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद निर्माण झाले आहेत. पवारांच्या या विधानावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत राष्ट्रवादीला भाजपची बी टीम म्हटलं आहे.

Sandeep Deshpande ,  Sharad Pawar
Government Offices News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ; कार्यालयांच्या वेळा बदलल्या ; आता सकाळी..

"अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजपनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का ? की दुसऱ्यांना भाजपची बी टीम आहे,असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत," असं टि्वट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर आरोप झाल्याप्रकरणात मोठे विधान केले आहे. त्यानंतर कालच्या (शनिवारी) पत्रकार परिषदेत त्यांनी जेपीसी गठीत करणे अयोग्य असल्याचे सांगितले.

Sandeep Deshpande ,  Sharad Pawar
ED Arrests Anil Jaisinghani : अनिल जयसिंघानीला अहमदाबादमध्ये ED कडून अटक

शरद पवार म्हणाले, "मी हिंडनबर्ग कंपनीचे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची(JPC) आवश्यकता राहिली नाही,"

Sandeep Deshpande ,  Sharad Pawar
Eknath Shinde Ayodhya Tour : शिंदेंनी जे केलं ते योग्यचं..मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे धर्माच्या विरोधात गेले ; अयोध्येत पुजारी..

"जेपीसीमध्ये २१ पैकी १५ सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. यात सत्ताधारी अधिक आहेत. त्यामुळे तेथे संशय निर्माण होऊ शकतो.पण माझा त्याला सरसकट विरोध नाही.जोपीसीपेक्षा न्यायालयाची समिती अधिक विश्वसनीय आहे," असे शरद पवार म्हणाले.

त्यावर "विरोधक एकत्रच आहेत, मात्र काही मुद्दांवरुन त्यांच्यात मतभेद असू शकतात," असे पवारांनी स्पष्टीकरण केले. काँग्रेसच्या जोरकस भूमिकेला पवारांनी छेद दिल्याची चर्चा आहे. यावेळी "अदानी मुद्दांपेक्षा महागाई , बेरोजगारी अधिक महत्व दिले पाहिजे," असे पवार म्हणाले.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com