Suresh Gopi : सुरेश गोपींनी सोडलं मौन! मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांवर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Suresh Gopi Ministership News : सुरेश गोपी हे भाजपचे केरळमधील एकमेव खासदार असून त्यांनी रविवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
Suresh Gopi
Suresh GopiSarkarnama

Modi Sarkar Cabinet Minister Suresh Gopi : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. रविवारी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. याचसोबत मोदींच्या मंत्रिमंडळातील 71 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यामध्ये 31 कॅबिनेट मंत्री, पाच राज्यमंत्री(स्वतंत्र पदभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

मात्र केवळ देशाचेच नव्हे तर अवघ्या जगाचेही लक्ष वेधून घेणाऱ्या या शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्री राजीनामा देण्याची शक्यता असल्याची बातमी अनेक प्रसिद्धी माध्यमांवर दिसू लागली.

Suresh Gopi
Suresh Gopi : मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब टाकणारे सुरेश गोपी मोदी-शाहांसाठी ‘सुपरस्टार!    

विशेष म्हणजे राजीनामा देणार असल्याची चर्चा ज्या मंत्र्याबद्दल होत होती, ते मंत्री म्हणजे भाजपचे केरळमधून निवडून आलेले एकमेव खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही आणि चुकीचे वृत्त दाखवले जात असल्याचे सुरेश गोपी यांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे.

सुरेश गोपी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून राजनीमा देणार आहे. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहोत.

सुरेश गोपी हे केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सीपीआईचे उमेदवार वी.एस. सुनीलकुमार यांना त्यांनी 74 हजार 686 मतांनी पराभूत केले आहे. गोपी हे राज्यसभेचे खासदारही होते. याशिवाय 1998 मध्ये आलेल्या 'कलियाट्टम'या त्यांच्या चित्रपटाला 'बेस्ट ॲक्टर'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Suresh Gopi
Suresh Gopi: मोदी-शहांच्या सरकारमधील मंत्र्याचा 15 तासांतच राजीनामा?

सरकार स्थापन करुन काही तासांतच मंत्र्याचा राजीनामाच्या चर्चांना सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. एवढंच नाहीतर काही माध्यमांनी सुरेश गोपींचा राजीनामा हा मोदी-शाहांसाठी हा धक्का असू शकतो, मात्र वैयक्तिक कारणामुळे म्हणजे त्यांनी चित्रपट 'साइन'केल्याने शुटींगला वेळ देता येणार नसल्याने राजीनामा देणार असल्याचेही म्हटले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com