Delhi News: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला चार शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. तसेच शंकराचार्यांमध्ये श्रीराम मंदिराच्या विषयावर मतभेद असल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र, या मुद्यांवर आता पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी अयोध्येला न जाण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी आपण प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला जाणार नसल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, 'राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयाचा आपल्या अहंकाराशी काहीही संबंध नाही. मात्र, ही एक परंपरेची बाब असल्याचे ते म्हणाले. हे सनातन परंपरेच्याविरोधात असल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला जात नसल्याचे कारण शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही चार शंकराचार्यांमध्ये श्रीराम मंदिराच्या विषयावर मतभेद असल्याचा गैरसमज पसरला आहे. मात्र, आमच्यामध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत. आमचे म्हणणे एवढेच होते की, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसार व्हावी, शंकराचार्यांची स्वतःची प्रतिष्ठा असते, हा अहंकाराचा विषय नाही. पंतप्रधान प्राणप्रतिष्ठा करतात, तेव्हा आपण बाहेर बसून टाळ्या वाजवणे अपेक्षित आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शंकराचार्यांनी व्यक्त केलेल्या या मतानंतर काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षही सरकारला कोंडीत पकडत आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप सुरू आहे, अशा परिस्थितीत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला एवढी घाई का? असा सवाल विरोधक उपस्थित करीत आहेत.
अयोध्येमध्ये 22 जानेवारीला भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेदेखील उपस्थित राहणार आहेत. सध्या अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.