अयोद्धेच्या शंकराचार्य महाराजांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी दिल्लीत 2011मध्ये केलेल्या उपोषणामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले.
Shankaracharya Maharaj & Anna Hazare
Shankaracharya Maharaj & Anna HazareSarkarnama

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी दिल्लीत 2011मध्ये केलेल्या उपोषणामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी त्यांना जलसंधारण कामासाठी भारतातील विविध मानाचे पुरस्कार मिळाले होते. त्यांच्याशी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी अयोद्धेचे परमहंस आचार्य शंकराचार्य महाराज यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. ही बैठक चर्चेचा विषय ठरत आहे. ( Shankaracharya Maharaj of Ayodhya visited Anna Hazare )

दिल्लीतील जंतरमंतर येथे 16 ऑगस्ट 2011पासून 13 दिवस अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते. हे आंदोलन देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा असे सांगितले जात होते. त्यावेळी अनेक सामाजिक संघटन व धार्मिक संघटनांनी अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी अण्णा हजारे यांना काहींनी तर देशातील दुसरे गांधी अशी उपमाही दिली होती. या आंदोलनानंतर 2014मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारून पराभव झाला होता. या आंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता.

Shankaracharya Maharaj & Anna Hazare
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

अण्णा हजारे यांची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. अण्णा हजारे यांनी सहा महिन्यापूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लोकायुक्त नेमण्याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

अयोद्धेतील शंकराचार्य महाराज यांनी काल अण्णा हजारे यांची भेट घेऊन देशातील विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली. या भेटीचे फोटोही अण्णा हजारे यांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करण्यात आले आहेत. यावरूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही भेट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Shankaracharya Maharaj & Anna Hazare
"...तर सरकारमधून पायउतार व्हा" : महाविकास आघाडीविरोधात अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

राज्यात अयोद्धेची क्रेझ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा व अयोद्धेचा मुद्दा काढल्यापासून राज्यात उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांचा अयोद्ध्या दौरा रद्द झाला. तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवारांनी अयोद्धेचा दौरा केला. त्यामुळे बातम्यात काही दिवस अयोद्धेची चर्चा राहिली. शंकरराचार्यांच्या भेटीमुळे पुन्हा अयोद्धेचे नाव चर्चेत येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com