BJP MLA T Raja News : 'बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी...' ; भाजप आमदार टी. राजा यांचं मोठं विधान!

Attacks on Hindus in Bangladesh : बांगलदेशमध्ये सरकार बदल झाल्यापासून हिंदूंवर आणि भारतीयांवर हल्ले अन् अत्याचार होत आहेत.
BJP MLA T Raja
BJP MLA T RajaSarkarnama
Published on
Updated on

T Raja on violence against hindu in Bangladesh : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. काही दिवसआधीच इस्कॉनचे महंत चिन्मय कृष्ण दास यांना अटक केली गेली आहे. याशिवाय, त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलावर जीवघेणा हल्ला झाला असून अन्य वकिलांना धमकवण्यात आलं आहे. या घटनांचे पडसाद आता भारतातही उमटत आहेत. भारताकडून वेळोवेळी बांगलादेश सरकारला याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

एवढंच नाहीतर भारतात काही ठिकाणी आता बांगलादेशी नागरिकांना हॉटेलमध्ये सेवा देण्यासही नकार दर्शवला जात आहे. पश्चिम बंगलामधील एका रूग्णलयाने तर रूग्ण दाखल करून घेण्यासही नकार दर्शवला आहे. या सर्व घडामोडीनंतर आता भाजपचे(BJP) हैदराबादमधील चर्चित आमदार टी राज यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.

हैदराबादेतील धरणा चौकात बांगलादेशी हिंदूंसाठी न्यायाची मागणी करत, हिंदू एकता मंचाने विरोध प्रदर्शन केले. हिंदू एकता मंचद्वारे आयोजित या सभेत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, इस्कॉनचे प्रतिनिधी आणि महंत सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार टी राजा सिंह यांनी चिन्मय कृष्ण दास(Chinmaya Krishna Das) यांच्या अटकेबाबत विधान केलं.

BJP MLA T Raja
Chinmoy Krishna Das lawyer News : बांगलादेशात आता चिन्मय कृष्ण दास यांच्या वकिलावर जीवघेणा हल्ला ; वकिलांना धमक्या!

टी. राजा नेमकं काय म्हणाले? -

टी. राजा म्हणाले, तो दिवस आठवा जेव्हा पाकिस्तानी मुस्लिमांद्वारे बांगलादेशी मुस्लिमांवर अत्याचार केले जात होते. त्यांच्या भगिनी अन् लेकींवर बलात्कार केले जात होते. आता तेलंगणाचे हिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदींना(Narendra Modi) मागणी करत आहेत की, तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशवर हल्ला करणे आवश्यक आहे. पाकिस्तानातून काही सैन्य बांगलादेशला पाठवलं जात आहे. तिथला हिंदू आज कुणाकडे बघेल. जेव्हा बांगलादेशी मुस्लिम आपल्या देशात लपून बसले आहेत, तर सीमेवर बसलेले आपले हिंदू आपल्या देशात का येवू शकत नाहीत. एवढंच नाही तर या सभेत उपस्थित अनेक साधू, महंतांनी सांगितले की, हाती शस्त्र घेत बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत.

BJP MLA T Raja
Indian Passengers bus and Bangladesh: बांगलादेशात भारतीय प्रवाशांच्या बसवर हल्ला; प्रवाशांना धमकावून, भारतविरोधी घोषणाबाजी

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार बघता, दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी बांगलादेश सरकारला हिंदूंवरील अन्याय, अत्याचार थांबवावेत असं म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com