
Bangladesh Violence News : बांगलादेशमध्ये दिवसेंदिवस हिंदूंवर आणि भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. आता चिन्मयकृष्ण दास यांची केस लढणारे त्यांचे वकील रामेन रॉय यांच्यावर इस्लामिक कट्टरपंथीयांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
हल्ल्यानंतर रामेन यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार(ICU) सुरू आहेत. विशेष म्हणजे आजच चिन्मयदास यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच त्यांच्या वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
ISKCON इंडियाने सोमवारी सांगितले की, चिन्मय कृष्ण दास यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील रामेन रॉय यांच्यावर इस्लामवादियांनी क्रूरपणे हल्ला केला आणि त्यांच्या घराचीही तोडफोड केली. रॉय हे सध्या ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. हल्ले आणि धमक्या मुस्लिम बहुल बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा आवाज दाबण्याचा भाग आहे.
चिन्मय कृष्ण दास(Chinmoy Krishna Das ) हे ISKCONचे साधू होते. मात्र संघटनेने सप्टेंबर महिन्यात त्यांच्यापासून काहीसे अतंर राखले होते. मात्र संघटना देशद्रोहाच्या आरोपात दास यांच्या अटकेविरोधात आवाज उठवत आहे. तर रामेन रॉय यांच्यावरील हल्ल्यानंतर अन्य स्थानिक वकिलांनाही धमकावण्यात आले आहे. परिणामी चिन्मय दास यांची बाजू मांडण्यास अन्य कोणतेही वकील समोर आले नाही. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून २ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता चिन्मय कृष्ण दास यांना महिनाभर तुरुंगातच रहावे लागणार आहे.
चिन्मय कृष्ण दास यांच्या टीमकडून सांगण्यात आले आहे की, चटगांव बार असोशिएशनचे मुस्लिम वकील सातत्याने हिंदू वकिलांना धमकावत आहेत. काही वकिलांच्या कार्यालांची तोडफोडही झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.