K. Annamalai News : भाजपचे आक्रमक नेते अण्णामलाई पद सोडणार? दक्षिणेत हालचालींना वेग...

Tamil Nadu BJP Chief K Annamalai Resignation News : तमिळनाडूमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजप आणि अण्णाद्रमुख हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
Annamalai, Narendra Modi
Annamalai, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News : दक्षिण भारतातील भाजपचे सर्वात आक्रमक नेते म्हणून के. अण्णामलाई यांचा दबदबा आहे. तमिळनाडू भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष असून सध्या या राज्यात त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने मागील लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर राजकीय हालचालीही वाढल्या आहेत.

अण्णामलाई यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सोडण्यास सांगितले जाऊ शकते, अशा चर्चांना वेग आला आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अण्णाद्रमुक. या पक्षातील नेते आणि अण्णामलाई यांचा 36 चा आकडा असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातच अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अंमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

Annamalai, Narendra Modi
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी साहिबा, कोणता धर्म घाणेरडा आहे?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार, असे तर्कविर्तक लढवले जाऊ लागले आहेत. पण त्यामध्ये अण्णामलाई अडसर ठरू शकतात, असेही बोलले जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होण्यासही तेच कारणीभूत होते. पण असे असले तरी सध्याची राजकीय स्थिती पाहता सत्ताधारी डीएमकेला दूर सारण्यासाठी दोन्ही पक्षांना आता एकत्र येण्याची गरज वाटू लागली आहे.

आघाडी करण्यासाठी अण्णामलाई यांना पदावरून हटवले जाणार नाही, तर त्यामागे राजकीय गणित असल्याचे सांगितले जात आहे. जातीय समीकरणे जुळवण्यासाठी अण्णामलाई यांना पद सोडावे लागू शकते. अण्णाद्रमुखचे प्रमुख पलानीस्वामी आणि अण्णामलाई हे दोघेही गौंडर समाजाचा दबदबा असलेल्या भागातील आहेत.

Annamalai, Narendra Modi
Bihar Election 2025 : मोदी-शाह जोडी काट्याने काटा काढणार! बिहार काबीज करण्यासाठी प्लॅन तयार...

अण्णामलाई यांना पदावरून हटवत इतर समाजातील दुसऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. अण्णामलाई हे भाजपमधील आक्रमक युवा नेतृत्व आहे. भाजपला राज्यात ओळख निर्माण करून देण्यात त्यांचेच मोठे योगदान आहे. पण केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना पदावरून दूर केले जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी राज्यात त्यांच्यावर भाजप नेतृत्वाचा अधिक भरवसा असेल, असेही तर्क लावले जात आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com