Amit Shah Controversy : शाहांनी स्टेजवर खडसावलं? महिला नेत्यानं सांगितलं ‘त्या’ व्हिडिओचं सत्य

Tamil Nadu BJP Tamilisai Soundararajan K Annamalai : चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीदरम्यान स्टेजवरच अमित शाहांनी भाजप नेत्या तमिलिसाई सुंदरराजन यांना खडसावल्याची चर्चा रंगली होती.
Tamilisai Soundararajan, Amit Shah
Tamilisai Soundararajan, Amit ShahSarkarnama

Tamil Nadu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीदरम्यान स्टेजवरील राजकीय नाट्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तेलंगणाच्या माजी राज्यपाल व भाजप नेत्या तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर संतापल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते.

शाह आणि तमिलीसाई यांच्यातील संवादाचा व्हिडिओ दोन दिवस सोशल मीडियात व्हायरल होत असताना त्यावर भाजप नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. उलट डीएमकेकडून शाह यांच्यावर टीका करण्यात आली होती.

अखेर गुरूवारी रात्री तमिलीसाई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शाहांनी खडसावलं नसल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा जोमाने काम करण्याचा सल्ला दिल्याचे तमिलीसाई यांनी म्हटले आहे.

तमिलीसाई यांची पोस्ट

तमिलीसाई यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्यी निकालानंतर पहिल्यांदा अमित शाहांशी संवाद साधला. निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. निवडणुकीनंतर करण्यात आलेली कार्यवाही आणि आगामी काळातील आव्हानांबाबत विचारण्यासाठी शाह यांनी बोलावले. मी विस्ताराने याबाबत सांगत असताना वेळ नसल्याने शाह यांनी अत्यंत गांभीर्याने राजकीय जीवनात आणि मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला. मी हे सर्व चर्चांना पुर्णविराम देण्यासाठी सांगत असल्याचे तमिलीसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Tamilisai Soundararajan, Amit Shah
PM Narendra Modi Team : पंतप्रधानांचे चार ‘अनमोल रत्न’! मोदींची टीम लागली कामाला...

नेमकं काय घडलं होतं?

नायडू यांच्या शपथविधीदरम्यान स्टेजवर शाह तमिलीसाई यांच्याशी संतापून बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. दोघांमधील काही सेकंदाच्या संवादानंतर तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोघांमधील गंभीर चर्चेला तमिळनाडूतील अंतर्गत वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तमिलीसाई आणि प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यातील वाद समोर आला होता. तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही. तसेच मतांची टक्केवारीही अपेक्षित वाढली नाही.

त्यावरून पक्षातील काही नेत्यांनी अण्णामलाई यांच्यावर पराभवाचा ठपका ठेवला आहे. तमिलीसाई यांनीही एका मुलाखतीत अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com