Political controversy over rupee symbol: तमिळनाडूमध्ये हिंदी आणि तमिळ भाषेवरुन वाद सुरु झाला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के .स्टॅलिन यांच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
द्रमुकला जर रुपया चिन्हाबाबत समस्या होती,तर 2010 मध्ये ते जेव्हा युपीए सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वीकृतीवर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल निर्मला सीतारमण यांनी उपस्थित केला आहे.
तमिळनाडू बजेटमध्ये रुपयांचे चिन्ह हटवून त्या ठिकाणी तमिळ भाषेतील चिन्ह ठेवण्याचा निर्णय स्टॅलिन सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रावरुन वाद सुरु आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या या निर्णयामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
केंद्र सरकारच्या हिंदी धोरणाचा विरोध म्हणून मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या सरकारने रुपयाचे '₹' हे चिन्हच हटवण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. '₹' हे अक्षर हिंदीऐवजी आता तमिळ भाषेमध्ये लिहिले जाणार आहे.
गेल्या काही दिवसापासून तामिळनाडूमध्ये भाषिक वाद सुरु आहे. मोदी सरकारने हिंदीची सक्ती केल्याने द्रमुकचे एम.के.स्टॅलिन सरकारने त्याला विरोध करीत भाषिक युद्ध पेटवल्याचे बोलले जाते. आता वा वादात रुपयांची 'ठिणगी'पडली आहे.
मोदी सरकारच्या हिंदी भाषा धोरणाचा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यांच्या सरकारने रुपयाचे '₹' हे चिन्हच हटवण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. '₹' हे अक्षर हिंदीऐवजी आता तमिळ भाषेमध्ये लिहिले जाणार आहे.
तमिळनाडू सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकांवर रुपयाचे चिन्हे तमिळ अक्षरात लिहिण्यात आले आहे. शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
याबाबत अद्याप अधिकृतपणे सरकारकडून काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या हिंदी धोरणाविरोधात हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.