मुंबई : चेंगलापट्टू : येथील एका नवविवाहित जोडप्याला मिळालेल्या गिफ्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जोडप्याला त्यांच्या मित्रांनी चक्क पेट्रोल आणि डिझेल गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल, डिझेलचा देशभरात दरवाढीचा भडका उडाला आहे. यातच विवाहात या जोडप्याला पेट्रोल आणि डिझेलसारखं गिफ्ट मिळाल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.
चेंगलापट्टू येथील चेय्यूर गावात हा विवाह सोहळा झाला होता. ग्रेस कुमार आणि किर्तना यांच्या विवाहात त्यांच्या मित्रांनी पेट्रोल, डिझेल भेट देण्याची शक्कल लढवली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे आता लग्नातही ते भेट देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. तमिळनाडू सध्या पेट्रोल 110.85 रुपये लिटर आणि डिझेल 100.94 रुपये लिटर आहे.
ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. दोन दिवसांपासून या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्याआधी 16 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू होती. आतापर्यंतची ही वाढ 10 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू होती. मागील दोन दिवसांपासून वाढ थांबल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (Petrol Diesel price hike News)
सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये झाला असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.