कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उदयनराजेंची उडी अन् फडणवीस करणार सांगता

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Udayanraje Bhosale and Devendra Fadnavis
Udayanraje Bhosale and Devendra Fadnavis Sarkarnama

पिंपरी : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे (Assembly Election) राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक भाजपने (BJP) आपल्या मोठ्या प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. म्हणूनच त्यांनी राज्यभरातील पक्षाचे सर्व बडे नेते हे या मतदारसंघात प्रचारात उतरवले आहेत. खासदार उदयनराजे भोसले हेसुद्धा या प्रचारात उडी घेणार असून, प्रचाराची सांगता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे यांच्या दौऱ्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरून अखेर हालचाली झाल्या. त्यानुसार आज दुपारी 4 वाजता उदयनराजेंचा रोड शो होत आहे. यामुळे अखेर उदयनराजे यांनी उत्तरच्या प्रचारात उडी घेतल्याचे दिसत आहे. याचबरोबर आमदार चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा आज कोल्हापूरमध्ये तेली समाजाचा मेळावा घेणार आहेत. या प्रराचाची सांगता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. फडणवीस यांची उद्या (ता.9) सायंकाळी 7 वाजता पेटाळा मैदान येथे जाहीर सभा असणार आहे. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या चित्रा वाघ आदी उपस्थित असतील. आज आणि उद्या भाजपने पदयात्रा आणि कोपरा सभांवर भर देण्याचे नियोजन केले आहे. तसेच, राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी या पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार आहेत. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला होणार असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे

Udayanraje Bhosale and Devendra Fadnavis
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा धक्कादायक खुलासा

भाजपच्या उत्तर मतदारसंघातील स्टार प्रचारकांमध्ये राज्यभरातील पक्षाचे मातब्बर नेते आहेत. यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. याचबरोबर आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, सुरेश हाळवणकर, चंद्रशेखर बावनकुळे, धनजंय महाडिक, सुरेश खाडे, समरजीत घाडगे, महेश जाधव, अतुल भोसले, राहुल चिकोडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, विक्रांत पाटील, एजाज देशमुख, शौमिका महाडिक यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, डॉ.भागवत कराड हे सुद्धा प्रचाराला येणार आहेत. श्रीकांत भारतीय, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रविंद्र चव्हाण, राज पुरोहित, किरीट सोमय्या, प्रसाद लाड, संदीप भंडारी, सुनील कर्जतकर यांचाही स्टार प्रचारकांत समावेश आहे. त्यांच्या जोडीला स्थानिक नेत्यांचीही फौज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com