खासदार श्रीकांत शिंदेंचे भाजपला उत्तर; ‘माझे जे काही होईल, ते कल्याणमधूनच...’

आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Srikant Shinde
Srikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माझा मतदारसंघ हा कल्याण (Kalyan) आहे. कल्याण आम्ही गेल्या आठ वर्षांत मजबूत बांधून ठेवलेला आहे. आपण मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात कामे केली आहेत. आगामी निवडणूक कल्याणमधून लढवण्यावर मी ठाम आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) जे काही होईल, ते कल्याणमधूनच होईल, असे खासदार श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांनी स्पष्ट केले. (I Will contest the Lok Sabha elections from Kalyan Constituency : Srikant Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाकडून दावा करण्यात येत आहे. त्या दृष्टीने भाजपने मतदारसंघात कामही सुरू केले आहे, त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार शिंदे यांनी आगामी निवडणूक कल्याणमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Srikant Shinde
महादेव जानकर करणार भाजपची गोची; बारामती स्वबळावर लढण्याची घोषणा!

श्रीकांत शिंदे म्हणाले की, आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युती एकत्र लढवणार आहे, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही वारंवार सांगण्यात येत आहे. अनुराग ठाकर यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आमच्या बरोबर जे बारा खासदार आले आहेत, त्या सर्व खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत तिकिट देण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फक्त माध्यमातून चर्चा होत आहे.

Srikant Shinde
राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली तानाजी सावंतांची भेट; पंढरपूरच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून कोणाला तिकिट द्यायचे, याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या आठ वर्षांत चांगल्या पद्धतीचे काम आपण केलेले आहे. आरोग्याच्या सुविधा, क्रीडा व इतर पायाभूत कामे आपण मोठ्या प्रमाणावर केली आहेत, त्यामुळे साहजिकच आहे की, मी आगामी निवडणूक ही कल्याणमधून लढवणार आहे आणि त्यावर मी ठाम असणार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Srikant Shinde
Kailas Patil|शिंदे गटाकडून आजही अनेक ऑफर्स ; आमदार कैलास पाटलांचा गौप्यस्फोट

कल्याणमध्ये कमळ फुलणार, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे, या प्रश्नावर मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काहीसे चिडून उत्तर दिले. ते म्हणाले की, मी तुम्हाला हेच सांगतो आहे की, भाजपच्या कुठच्या नेत्याने तसे स्टेटमेंट केले आहे, ते मला दाखवा. माझा मतदारसंघ कल्याण आहे आणि आगामी काळातही तोच राहणार आहे. कल्याण आम्ही गेल्या आठ वर्षांत मजबूत बांधून ठेवलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जे काही होईल, ते कल्याणमधूनच होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, भाजपचा संघटनात्मक कामांचा कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी किंवा युती झाली नव्हती, त्याअगोदरचा होता. तो कार्यक्रम ते राबवत आहेत. तसेच प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याची मुभा असते. पक्षसंघटन कसे वाढेल, त्यासाठीच कोणताही पक्ष काम करत असतो. त्यामुळे भाजपच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या तयारीकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नाही. त्यामुळे आगामी निवडणूक युतीमध्ये लढली जाणार आहे. ज्या ठिकाणी त्या पक्षाचा खासदार आणि आमदार आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ सोडण्यात येणार आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम थांबवले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com