Video YSRCP Office Demolish : पुन्हा बुलडोझर..! जगन मोहन रेड्डींना तिसरा धक्का; चंद्राबाबू नायडू 'त्या' अश्रूंचा सूड घेतायत का?

Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy : 19 नोव्हेंबर 2021 रोजी वायएसआरसीपी नेत्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या. त्यावेळी नायडू ढसाढसा रडले होते.
YSRCP Office Demolish
YSRCP Office DemolishSarkarnama
Published on
Updated on

Andgra Pradesh Politics : आंध्र प्रदेशात सत्ता उलथवल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सूडाचे राजकारण करत असल्याची टीका होऊ लागली आहे. सत्तांतरानंतर फक्त दोन आठवड्यातच प्रशासन माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या मागे हात धुवून लागले आहे. आता विजयवाडा येथील ताडेपल्ले जिल्ह्यातील 'वायएसआरसीपी'चे कार्यालय शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले.

सत्ताबदलानंतर आंध्रात आतापर्यंत सरकारने जगनमोहन रेड्डी यांची दोन कार्यालयांवर बुलडोजर चढवले तर अलिशान महल सील केला आहे. वायएसआरसीपीचे हे कार्यालय पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. यानंतर वायएसआरसीपीने हे आता सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

ताडापल्ली येथील पक्षाचे कार्यालय शनिवारी (ता. २२) पहाटे बुलडोझरने फोडले. हे कार्यालय बेकायदेशीर जमीन ताब्यात घेऊन बांधल्याचा आरोप होता. त्यावर वायएसआरसीपी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निकाल येण्यापूर्वीच कार्यालय पाडण्यात आले.

YSRCP Office Demolish
Maratha Reservation : 'जरांगेंचा बोलविता धनी दुसराच...'माजी राज्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

वायएसआरसीपीकडून या कारवाईच निषेध केला जात आहे. राज्याच्या इतिहासात पक्षाचे कार्यालय फोडण्याची ही कारवाई पहिल्यांदाच घडली आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास बुलडोझरच्या सहाय्याने इमारत फोडून पाडण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

सत्तेत येताच मुख्यमंत्री नायडूंनी आपले विरोधक वायएसआरसीपीचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचा धडाकाच लावल्याचे बोलले जात आहे. नायडू आपल्या अडीच वर्षांपूर्वीच्या आश्रूंचा बदला तर घेत नाहीत ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चंद्राबाबूंच्या आश्रूंची कहाणी

आंध्र प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान 19 नोव्हेंबर 2021 रोजी वायएसआरसीपी नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या. ती टीका जिव्हारी लागल्याने चंद्राबाबू नायडू सभागृहातून बाहेर पडले. त्यावेळी नायडू यांनी सत्तेत परत येईपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही, अशी शपथ घेतली आणि त्याचवेळी ते ढसाढसा रडले होते.

YSRCP Office Demolish
Asaduddin Owaisi on Reservation : महाराष्ट्रात आरक्षणावरून गदारोळ सुरू असताना ओवैसींचीही मोठी मागणी; म्हणाले 'अल्पसंख्यांकांना..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com