Asaduddin Owaisi on Reservation : महाराष्ट्रात आरक्षणावरून गदारोळ सुरू असताना ओवैसींचीही मोठी मागणी; म्हणाले 'अल्पसंख्यांकांना..'

OBC Vs Maratha Reservation : राज्यात सध्या आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजात तणाव निर्माण होताना दिसत आहे
Asuddin Owaisi
Asuddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज-लातूर आणि अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी टायर जाळऊन रास्ता रोको केलं.

ओबीसी कोट्यामधून मराठा आरक्षण देण्याच्या विरोधात हे आंदोल केलं गेलं. यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल केला.

ओवैसींनी(Asaduddin Owaisi) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टद्वारे म्हटले की, निवडणुकीच्या दरम्यान मोदी म्हणत होते की, ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या आरक्षणाला मुस्लिमांपासून धोका आहे. ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्य्यावरून आज तणावाची परिस्थिती आहे. कारण, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित केलेली आहे.

Asuddin Owaisi
OBC Political Breaking : मोठी बातमी! अखेर दहा दिवसानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारेंचं उपोषण स्थगित

भारताच्या अल्पसंख्याक, मागास, अतिमागासवर्गीयांना भाकरीसाठी लढवलं जात आहे आणि मलाई आणखी कुणी खात आहे. आगामी संसदीय अधिवेशनात 'चारसौ पार' सरकारने सुधारणा करून 50 टक्क्यांची मर्यादा संपवायला हवी.

वडीगोद्री येथे ओबीसी समाजांच्या मागण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. हाके यांची शनिवारी (ता. 22 जून) रोजी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीदरम्यान, ओबीसी (OBC) समाजाचे नेते आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची मागणी केली.

Asuddin Owaisi
Video Chhagan Bhujbal : हाकेंच्या उपोषणस्थळावरून छगन भुजबळांची मोठी मागणी,' ओबीसींना विधानसभा...'

तसेच सरकार कुणावरही अन्याय करणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. त्यांच्या या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. यावेळी हाके यांनी सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचेही स्पष्ट केलं. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com