बंगळूर : धर्मांतर (Conversion) सुरू असल्याचा आरोप करून भाजपच्या (BJP) आमदाराने (MLA) खळबळ उडवून दिली होती. यामुळे कर्नाटकातील (Karnataka) सत्ताधारी भाजपने तातडीने कारवाईची पावले उचलत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी करून असे काहीही घडले नसल्याचा अहवाल देऊन तहसिलदारांनी (Tehsildar) भाजप आमदाराला उघडे पाडले होते. आता राज्य सरकारने या तहसिलदारांची तडकाफडकी बदली केली आहे. विशेष म्हणजे त्यांना दुसरीकडे कुठे नियुक्ती देण्यात आलेली नाही.
होसदुर्गचे तहसिलदार वाय.थिप्पेस्वामी यांची बदली झाली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात हा तालुका आहे. भाजपचे आमदार गूलिहट्टी शेखर यांनी धर्मांतर सुरू असल्याचा आरोप केला होता. अनुसूचित जाती, अनुसचित जमाती आणि इतर मागास वर्गातील नागरिकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला होता. यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलत तहसिलदार थिप्पेस्वामी यांना चौकशीचे आदेश दिले होते.
तहसिलदारांनी या प्रकरणी चौकशी करुन 1 डिसेंबरला अहवाला सादर केला. अशा प्रकारचे कोणतेही धर्मांतर झाले नसल्याचे सत्य त्यांनी अहवालात मांडले. यामुळे भाजप आमदारांचा खोटेपणा समोर आला. तो उघडा पडल्याने त्याने राजकीय हेतूतून हा आरोप केल्याची टीका विरोधक करीत आहेत. यानंतर या कामगिरीचे बक्षीस तहसिलदारांना मिळाले आहे. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीबाबत चित्रदुर्गच्या उपायुक्त कविता एस.मन्नीकेरी म्हणाल्या की, तहसिलदारांची बदली करताना योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. ते दोन वर्षे एकाच ठिकाणी नियुक्तीस होते. त्यांची बदली आणि धर्मांतर चौकशी अहवालाचा संबंध नाही.
तहसिलदार थिप्पेस्वामी हे मागील दोन आठवड्यांपासून आजारी असल्याचे कारण त्यांच्या बदलीसाठी देण्यात आले आहे. याचवेळी त्यांना दुसरीकडे कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशी माहिती तहसिलदार कार्यालयातील सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने थिप्पेस्वामी यांचा अहवाल योग्य असल्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी आमदाराने मात्र, हा अहवाल खोटा असल्याचा कांगावा केला होता. आता तर कर्नाटक सरकारने धर्मांतर बंदी कायदा आणण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे उदाहरण दिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.