मोदी सरकारविरोधात असहकार! हजारो नागरिक उतरताहेत रस्त्यावर

केंद्र सरकारच्या विरोधात हजारो संतप्त नागरिक दररोज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत.
Protest march in Nagaland capital Kohima 

Protest march in Nagaland capital Kohima 

Sarkarnama

कोहिमा : नागालँडमध्ये (Nagaland) लष्कराने (Indian Army) केलेल्या गोळीबारात 13 नागरिक ठार झाले आहेत. यावरून या राज्यात वादळ उठले असून सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या (Modi Government) विरोधात हजारो संतप्त नागरिक दररोज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. याचबरोबर मोदी सरकार विरोधात असहकार पुकारण्यात आली आहे.

नागालँडमधील मोन जिल्ह्यात 4 डिसेंबरला रोजी 13 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. लष्कराच्या जवानांनी बेछूट केलेल्या गोळीबारात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामध्ये एक जवानही हुतात्मा झाला होता. त्यानंतर नागालँडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये तणावाची स्थिती आहे. राज्यात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी लवकरच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राज्यात दररोज हजारो नागरिक रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करीत आहेत.

नागालँडची राजधानी कोहिमामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. कोन्याक युनियनने मोदी सरकारविरोधात असहकार पुकारला आहे. आधी मोन जिल्ह्यापुरते असलेल्या या असहकार आंदोलनाचा वणवा आता राज्यभरात वेगाने पसरू लागला आहे. राज्यभरात दिवसेंदिवस आंदोलनाचा जोर वाढत आहे. मोन जिल्ह्यात काल (ता.16) बंद पाळण्यात आला. या बंदमुळे दिवसभर सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालये बंद होती तर वाहतूक विस्कळित झाली होती. किफिरे, टुएनसँगस नोकलाक आणि लोंगलेंग या जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर उतरल्याने दुकाने पूर्णपणे बंद होती.

<div class="paragraphs"><p>Protest march in Nagaland capital Kohima&nbsp;</p></div>
काँग्रेस नेत्यावर स्मृती इराणी भडकल्या अन् म्हणाल्या, त्यांना आधी निलंबित करा!

मोन जिल्ह्यातील लष्करी मोहिमेत सहभागी असलेल्या जवानांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याचबरोबर लष्करी विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. शहांनी संसदेत दिलेली माहिती कामकाजातून काढून टाकावी आणि त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चात शहांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले होते.

<div class="paragraphs"><p>Protest march in Nagaland capital Kohima&nbsp;</p></div>
केंद्रीय मंत्र्याच्या हकालपट्टीचा तिढा; भाजपला 77 जागांवर फटका बसण्याची भीती

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात मोनमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. शहांनी या घटनेबाबत संसदेत दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनात ओटिंग गावातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. या घटनेत ठार झालेल्या 14 नागरिकांपैकी 12 जण या गावातील आहेत. या नागरिकांचे नेतृत्व कोन्याक युनियन या आदिवासींच्या शिखर संघटनेने केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com