SSC Paper Leak Case : भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक ; कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी रोखली ; video पाहा

Telangana bjp chief bandi sanjay kumar arrest : कार्यकर्त्यांनी घटनास्थळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले
bandi sanjay kumar arrest
bandi sanjay kumar arrestSarkarnama

Telangana bjp chief bandi sanjay kumar arrest : तेलगंणा भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना करीमनगर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री मध्यरात्री अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पेपर लीक प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

बंदी संजय कुमार यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन जात असताना भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला पागवण्यासाठी पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेले. त्यांना नलगौंडा जिल्ह्यातील बोम्माला रामाराम पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

bandi sanjay kumar arrest
Raju Shetty Big Announcement : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा ; दोन्ही सरकारला कंटाळलो..

पोलिस त्याच्या घरी पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणि अटकेत असलेल्या संजय यांचे समर्थक त्याच्या घरी जमले आणि पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी घटनास्थळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

bandi sanjay kumar arrest
Thackeray Vs Fadnavis : 'फडतूस - काडतूस' वरुन अंधारे फडणवीसांना असं का म्हणाल्या, "..तुमच्या घरात एक बाई .."

"बंदी संजय यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे. ही एक प्रकारे राज्यातील पंतप्रधानांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न करत आहात. एवढ्या रात्री बंदी संजय यांना अटक करण्याची काय गरज होती? त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे देखील आम्हाला सांगण्यात आलेले नाही," असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रेमेंद्र रेड्डी यांनी सांगितले.

"आम्हाला कारण माहित आहे की ते राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. केसीआर सरकार पीएम मोदींच्या राज्य दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. बंदी संजय यांच्या अटकेविरोधात राज्यभर आंदोलन केले जाणार आहे," असा इशारा प्रेमेंद्र रेड्डी यांनी दिला आहे. भाजपा नेता तरुण चुघ म्हणाले, "बंदी संजय यांची अटक बेकायदा आहे. त्यांना का अटक करण्यात आली, याबाबत पोलिसांनी खुलासा करावा, सत्तेचा दुरुपयोग सरकार करीत आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com