T Raja Singh Resignation - टी राजा सिंह यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरला भाजपचा 'हा' नेता!

T Raja Singh’s Sudden Resignation from BJP -आता भाजप टी राजा सिंह यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल का?, की टी राजा हे स्वतंत्र पक्ष स्थापन करतील याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
T Rajasingh
T RajasinghSarkarnama
Published on
Updated on

Role of N Ramchandra Rao in Telangana BJP Politics -तेलंगणमधील भाजपचे फायर ब्रॅण्ड नेते आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते अशी प्रतिमा असणारे टी राजा सिंह यांनी भाजपमधून राजीनामा दिला आहे. तेलंगण भाजप अध्यक्षपदासाठी भाजपने एन रामचंद्र राव यांच्या नावावर सहमती दर्शवली होती,  परंतु टी राजा सिंह या निर्णयावर नाराज होते, म्हणून त्यांनी पक्षातून राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

एन रामचंद्र राव हे तेलंगणमधील एक वरिष्ठ भाजप नेते आहेत. आता ते तेलंगणात भाजपची जबाबदारी स्वीकारतील. त्यांना राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जाते. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत आणि ब्राह्मण समुदायातून आले आहेत.

तेलंगणातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यंच्या एका गटाने आणि पक्षाच्या एका गटाने नेतृत्वाकडे त्यांच्या नावाची शिफारारस केल्यानंतर पक्षाने रामचंद्र राव यांच्या बाजूने निर्णय घेतल्याचे मानले जाते. त्यांचे आरएसएसमध्ये चांगले संबंध आहेत, शिवाय, बालपणासासून अभाविपच्या शाळेत शिकूनच ते मोठे झाले आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यापासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत व भाजपचे कट्टर नेते आहेत. पक्षाच्या सर्व घटकांना ते स्वीकारार्ह असल्याने पक्षाने त्यांची निवड केली असे म्हटले जात आहे.

T Rajasingh
T Raja Singh : भाजपला मोठा झटका; आक्रमक नेते टी राजा यांचा राजीनामा, अध्यक्ष निवडीवरून उचललं टोकाचं पाऊल

जरी ते ब्राह्मण समाजातून आले असले तरी, साडेतीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांपर्यंत पक्षाला चालना देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवडणुकीपूर्वी पक्ष नवीन चेहरा निवडू शकतो, कारण अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. त्यानंतर पक्ष मागास जातीतील नेता निवडू शकतो, असं राजकीय अभ्यासकाचं मत आहे.

T Rajasingh
Manoj Jarange and Laxman Hake : जरांगेंनी 'चलो मुंबई'ची घोषणा करताच, हाकेंनीही पुण्यातून सुरू केलं प्लॅनिंग!

रामचंद्र राव यांच्या निवडीमुळे पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रामचंद्र राव यांच्याव्यतिरिक्त अनेक नावे चर्चेत होती. ज्यामध्ये निजामाबादचे खासदार धर्मपूरी अरविंद आणि केंद्रीयमंत्री बंदी संजय कुमार यांचा समावेश होता. आता भाजप टी राजा सिंह यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल का?, की टी राजा हे स्वतंत्र पक्ष स्थापन करतील याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

(Edietd by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com