Ukraine Russia War : रशियाच्या 'रडार'वर आता युक्रेनचं 'बखमुत' शहर : झेलेन्स्की म्हणाले, 'जनजीवन उद्धस्थ...'

Ukraine Russia War : "रशियन सैनिकांच्या मृतदेहांनी भरून गेले आहे."
Ukraine Russia War
Ukraine Russia War Sarkarnam
Published on
Updated on

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास अकरा महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध अजूनही संपलेले नाही. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील बाखमुत शहराभोवती युक्रेनच्या ठिकाणी आक्रमण कारवायांमध्ये वाढ केले आहे. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दावा केला की, ऱशियाच्या या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू आणि विध्वंसाची मालिका वेगळ्या स्तरावर पोहोचले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोमवारी उशिरा बाखमुत आणि सोलेदर शहरात सांगितले की, "येथील सर्व काही आता नष्ट झाले आहे, तेथील जनजीवन जवळजवळ संपुष्टात आले आहे."

Ukraine Russia War
Russia Ukraine War : युद्ध संपता संपेना; युक्रेनकडे वेळेची कमतरता तर रशियाची प्रतिष्ठा पणाला!

झेलेन्स्की म्हणाले, 'सोलेदरच्या आजूबाजूचा परिसर रशियन सैनिकांच्या मृतदेहांनी भरून गेले आहे. सर्व ठिकाणी हल्ल्याच्या खुणा आहेत. हे फार वेडेपणासारखं वाटतं.' रशियाने सुमारे दीड महिन्यांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केले आणि गेल्या वर्षी दोनेस्तक आणि इतर तीन युक्रेनचे प्रांत ताब्यात घेतले; पण त्याच्या सैन्याला पुढे जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये युक्रेनने दक्षिणेकडील खेरसन शहर पुन्हा ताब्यात घेतल्यापासून, दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला आहे.

उप संरक्षण मंत्री हन्ना मलयार म्हणाल्या, 'रशियाने मोठ्या संख्येने सैनिक लढाईत उतरवले आहेत. शत्रू आपल्या सैनिकांच्या मृतदेहांवर चाल करत आहे आणि आपल्याच सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी तोफांचा, रॉकेट लाँचरचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. "रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांना उद्धस्त करत आहेत आणि या अतिशय हीन रणनीतीसाठी सर्व प्रकारची शस्त्रे ते वापरत आहे," त्यांनी एका टेलिव्हिजन निवेदनात म्हटले आहे की, 'रशिया कोणतेही नियमांशिवाय, कोणत्याही संकेतांना पालन न करता युद्ध करत आहे. ज्यामुळे नागरिकांचा मृत्यू सातत्याने वाढ होत आहे. शहर उद्धस्त होत आहेत.

रशियने-व्यापलेल्या दोनेस्तक भागाचे क्रेमलिन समर्थक नेते डेनिस पुशिलिन यांनी मंगळवारी एका रशियच्या एका चँनेलला सांगितले की, रशियाचे सैन्य सोलेदर शहराला ताब्यात घेण्याच्या जवळपास आहेत. परंतु याचे वेगळे परिणाम उद्भवू शकतात. शहरावरील नियंत्रणामुळे बाखमुट ताब्यात घेण्याची शक्यता दृष्टीपथात असेल, तसेच सिव्हर्स्कवर पुढील हल्ले करणे रशियासाठी सोपे होणार आहे. सिवार्स्क उत्तर दिशेकडे आहे. तर युक्रेन हा मध्यवर्ती भाग आहे.

Ukraine Russia War
Ukraine Russia War : युद्धविरामानंतरही रशियाने आमच्यावर हल्ले केले : युक्रेनने लावले आरोप!

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी ट्विट केले की, रशियाच्या खाजगी लष्करी कंत्राटदार रशियन सैन्याने अलिकडच्या दिवसांत सोलेदर शहरात नियंत्रण मिळवण्यच्या दृष्टीने कूच केली आहे. "संपूर्ण शहर ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.. मंत्रालयाने पुढे सांगितले की, सोलेदर हे उत्तर बाखमुतपासून 10 किमी अंतरावर आहे आणि असे दिसते की, सोलेदरला ताब्यात घेणे, हा बाखमुतला वेढा घालण्याच्या मॉस्कोच्या धोरणाचा एक भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com