
Gurdaspur Police Grenade Attack : पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सहभागी तीन संशयित खालिस्तानी दहशतवादी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेले. पंजाब पोलिसांचे पथक तब्बल 756 किलोमीटर पर्यंत या दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. नंतर मग उत्तर पोलिसां च्या मदतीने हे ऑपरेशन चालवलं गेलं. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक गौरव यादव यांनी यास पाकिस्तान प्रयोजित दहशतवादी मॉड्यूलच्या विरोधातील मोठं यश म्हटलं आहे.
पीलभीत येथीप पूरनपूर भागात खालिस्तान जिंदाबादल फोर्सचे सदस्य आणि उत्तर प्रदेश व पंजाब पोलिसांमध्ये संयुक्त टीममध्ये धक्काबुक्की झाली. डीजीपी गौरव यादव यांनी म्हटले की, तिन्ही दहशतवाद्यांची ओळख वरिंदर सिंह उर्फ रवि(23), गुरविंदर सिंह(25) आणि जशनप्रीत सिंह उर्फ प्रताप सिंह (18) अशी झाली आहे. हे तिन्ही कलानौर पोलीस स्टेशन परिसरात राहणार होते.
डीजीपीच्या मते त्या तिघांवर पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील कलनौरमध्ये बख्शीवाला पोलिस(Police) स्टेशनवर हल्ला करण्याच्या आरोप आहे. याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की, अशातच घडलेल्या बख्शीवाला घटनेत कोणी जखमी झाले नव्हते.
उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महानिरीक्षक(कायदा सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी म्हटले की, तिघेही गुरदासपुरमधील पोलिस चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभागी होते. त्यांनी सांगितले की, चकमकीत तिघेही गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांना तत्काळ उपचारासाठी सीएसी पूरनपूर येथे नेले गेले. मात्र तिघांचाही नंतर मृत्यू झाला. त्यांच्या ताब्यातून एके-47 रायफल, दोन ग्लॉक पिस्तुलं आणि मोठ्याप्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंजाब पोलिस प्रमुख गौरव यादव यांनी म्हटले की, पाकिस्तान प्रायोजित खालिस्तान जिंदाबाद फोर्स दहशतवादी मॉड्यूलच्या विरोधात एक मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या एका संयुक्त अभियानात तीन मॉ़ड्यूल सदस्यांसोबत चकमक झाली, ज्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.