Raut - Malik Meet: ''कोश्यारींना गांभीर्यानं घेता,त्यांचे बेकायदेशीर निर्णय..?''; मलिकांच्या भेटीनंतर राऊतांचं मोठं विधान

Political News : भविष्यात देशात परिवर्तन हवं असेल, तर...
Sanjay Raut - Satyapal Malik
Sanjay Raut - Satyapal Malik Sarkarnama

Delhi News: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला, जम्मू काश्मीरामधील 370 कलम हटवणं, शासकीय कर्मचाऱ्यांचे विमा कंत्राट देण्यासाठी रिलायन्सने देऊ केलेल्या लाचेचं प्रकरण, वादग्रस्त शेतकरी कायदे यांसारख्या विविध मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केलं होतं. पुलवामा हल्ल्यावरील त्यांच्या प्रतिक्रियेवरुन ते सध्या जोरदार चर्चेत आहे. याच मलिकांची आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. अखेर आज(दि.२७) राजधानी दिल्लीत राऊत- मलिक यांची भेट दुपारी १२ वाजता झाली आहे. या भेटीदरम्यान संजय राऊतांनी सत्यपाल मलिक यांना मुंबई दौऱ्याचं आमंत्रण देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक आणि संजय राऊत भेटीला विशेष महत्व आहे

Sanjay Raut - Satyapal Malik
Radhakrishna Vikhe : शिंदे गटाचा 'हा' नेता म्हणतो,राधाकृष्ण विखे माझ्या ह्दयात आणि त्यांनी मुख्यमंत्रीही व्हावं...

भेटीनंतर राऊत काय म्हणाले?

सत्यपाल मलिक यांच्या भेटीवर राऊत म्हणाले,मी आज सत्यपाल मलिकांची सदिच्छा भेट घेतली. भविष्यात देशात परिवर्तन हवं असेल, तर त्यांची काय भूमिका राहिल यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. यावेळी जाट, एससी समाजाचे नेते उपस्थित होते. ते पुढं म्हणाले, बाकीची चर्चा आम्ही भविष्यात करत राहू. सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात यायचं आहे.

...मग मलिकांच्या वक्तव्यांना का दोष देता?

सध्या ते हरियाणा, राजस्थान, बिहार अशा भागात जावून आले आहेत. महाराष्ट्रात येण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे.यावेळी त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. कोश्यारींचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलं जातं. ते सत्य मानलं जातं. त्यांचे निर्णय सत्य मानले जातात, जे बेकायदेशीर आहेत. त्यांनी केलेलं राजकारण तुम्ही सत्य मानता, मग सत्यपाल मलिकांच्या वक्तव्यांना का दोष देता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Sanjay Raut - Satyapal Malik
Ashok Chavan Thanaks To Nitin Gadkari : अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार..

राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवावा...

खासदार संजय राऊत व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची दिल्लीत भेटीवर भाजप नेते आमदार नितेश राणे(Nitest Rane) यांनी जोरदार तोंडसुख घेतले आहे. राणे यांनी आजच्या तारखेला पाकिस्तान मलिक यांचे गोडवे गात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचं काम प्रतिमा खराब करण्याचं काम हे मलिक करत असताना राऊत काय त्यांची चाटायला निघालेत का असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे. त्यामुळे राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवावा अशी मागणी आपण सरकारला आवाहन करत असल्याचंगी राणे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com