Priyanka Chaturvedi Meets Shah: ठाकरे गटाच्या खासदाराने केली फडणवीसांची थेट शाहांकडे तक्रार; अहवाल मागवण्याची विनंती

Priyanka Chaturvedi News : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतली अमित शाह यांची भेट
Priyanka Chaturvedi met Amit Shah
Priyanka Chaturvedi met Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Priyanka Chaturvedi met Amit Shah News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी आज (ता. ५) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, या भेटीमागचे कारण चतुर्वेदी यांनी सांगितले.

चतुर्वेदी म्हणाल्या, ''महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संदर्भात भेट घेतल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या. मी अमित शाहांना म्हणाले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेसंदर्भात अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार, संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या, अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याचीही त्यांनी सांगितले.''

Priyanka Chaturvedi met Amit Shah
Priyanka Chaturvedi : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतली अमित शाहांची भेट; कारण...

महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले. छत्रपती संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली हे सर्वांनी पाहिले. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली. त्यांना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागले आहेत. ही कोणत्या प्रकारची कायद्याची स्थिती आहे, व हा कोणता न्याय आहे,''असा सवाल चतुर्वेदी यांनी केला.

त्यावर अमित शाह म्हणाले, आम्ही दोषींवर कारवाई करू. याबाबत त्यांनी आश्वासन दिले'' असेही चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव असू नये. ज्यांनी हे काम केले त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, असा हल्लाबोल चतुर्वेदी यांनी केला.

Priyanka Chaturvedi met Amit Shah
Supreme Court News : ईडी-सीबीआयच्या विरोधातील 14 पक्षांची याचिका SC ने फेटाळली; सरन्यायाधीश म्हणाले...

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला, प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावर ते म्हणाले, त्यांना भाजपमध्ये जायचे असेल, राज्यातील गृहमंत्री आमचे आहेत, केंद्रीय गृहमंत्री आमचे आहेत. आणि त्यांच्याकडेच तक्रार, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com