Thalapathy Vijay Political Party: सुपरस्टार थलपती विजयने अखेर सक्रीय राजकारणात धमाकेदार पदार्पण केलं आहे. रविवारी त्याच्या तमिलगा वेत्री कळघम पक्षाच्या पहिल्या अधिवेशनास त्याने संबोधित केले. त्यावेळी प्रचंड मोठी जनसमुदाय लोटला होता. याप्रसंगी त्याने आपल्या पक्षाची भूमिका आणि राजकाणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. शिवाय लोकाना राजकारणाच अर्थही सांगितला.
राजकारण हे चित्रपटासारखे क्षेत्र नाही, तर हे एकप्रकारे युद्ध क्षेत्र आहे असं त्याने म्हटले. याशिवाय पक्षाच्या सदस्यांनी तळागाळात पोहचून काम करावे, सजग रहावे अशी सूचनाही केली. राजकारण गांभीर्याने विनोदापणाने घेतले तरच या क्षेत्रात आपण टिकून राहू शकू , असंही थलपती विजयने(Thalapathy vijay) बोलून दाखवले.
याचबरोबर पक्षाच्या विचारसणीवर भाष्य करताना थलपती विजयने सांगितले की, द्रविड राष्ट्रवादी आणि तामिळ राष्ट्रवाद वेगळे करणे हे त्यांचे ध्येय नाही. या देशाचे दोन डोळे आहेत, आपण स्वत:ला कोणत्याही एका ओळखीपुरते मर्यादित ठेवू नये. धर्मनिरपेक्ष सामाजिक न्यायाच्या विचारसरणीवर त्यांनी आपल्या पक्षाचा पाया अधोरेखित केला आणि म्हटले की टीव्हीके त्यानुसारच काम करेल.
याशिवाय विजयने डीएमके वर जोरदार टीका करत म्हटले की, एक कुटुंब राज्याची लूट करत आहे. मी राजकारणात येण्यासाठी माझा अभिनय सोडला आहे. मी इथे तुमचा विजय म्हणून आलो आहे आणि तुम्हा सर्वांवर विश्वास ठेवतो. एक गट आहे जो एकच गाणे गात आहे, राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला लेबल लावत आहे आणि लोकांना धोका देत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.