Rajya Sabha
Rajya SabhaSarkarnama

आधीचा गोंधळ भोवला; अनिल देसाईंसह बारा खासदार निलंबित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरूवात झाली आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची (Parliament Winter Session) वादळी सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा व राज्यसभेत तीन कृषी कायदे मागे घेणारे विधेयक सादर करण्यात आले. याचदरम्यान राज्यसभेतील बारा खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (ता. 11 ऑगस्ट) झालेल्या गोंधळातील खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सभागृहात बेशिस्त वर्तनाचे कारण देत त्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांना आता अधिवेशन संपेपर्यंत कामकाजात सहभाग घेता येणार नाही. या बारा जणांमध्ये शिवेसेनेचे खासदार अनिल देसाई व प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. तसेच काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि सीपीएम व सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

Rajya Sabha
आफ्रिकेतून हजार जण मुंबईत; आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

पावसाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या दिवशी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. राज्यसभेत विमा विधेयक सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला होता.

विमाविषयक विधेयकाला विरोध करत अनेक सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी केली होती. त्यावेळी सभागृहात सुरक्षारक्षक बोलवण्यात आले होते. त्यावरूनही मोठा गदारोळ निर्माण झाला होता. सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षकांमध्येही झटापट झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना त्यांचे डोळेही पाणावले होते.

मागील अधिवेशनात झालेल्या गोंधळातील खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आधीपासून विचाराधीन होता. त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब करत बारा जणांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, मागील अधिवेशनात झालेला गोंधळ या अधिवेशनात होऊ नये, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळीच विरोधकांना आवाहन केले आहे. पण कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकांवर चर्चा न झाल्याने विरोधकांनी जोरदार घालता. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

निलंबित बारा खासदार पुढीलप्रमाणे -

1. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना)

2. अनिल देसाई (शिवसेना)

3. अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)

4. सईद नासीर हुसेन (काँग्रेस)

5. राजमनी पटेल (काँग्रेस)

6. रिपून बोरा (काँग्रेस)

7. छाया वर्मा (काँग्रेस)

8. फुलो देवी नेतम (काँग्रेस)

9. शांता छेत्री (टीएमसी)

10. डोला सेन (टीएमसी)

11. एलामराम करीम (सीपीएम)

12. बिनॉय विश्वम (सीपीआय)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com