Wrestlers Protest News : आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ '1983 विश्वचषक विजेता संघ' उतरला मैदानात!

Wrestlers Protest News : "कोणताही निर्णय घेताना घाई नको..." माजी क्रिकेटपटूंची भूमिका..
Wrestlers Protest News :
Wrestlers Protest News :Sarkarnama

National News : 1983 च्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी आज शुक्रवारी कुस्तीपटूंना घाईघाईने निर्णय न घेण्याचे आवाहन केले. आणि कुस्तीपटूंचे तक्रारी, त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले पाहिजे, आणि यावर सरकारकडून निरसन केले जावे, अशी भावनाही व्यक्त केली. सुनील गावसकर, मदन लाल, कपिल देव, दिलीप वेंगसरकर इत्यादी दिग्गज क्रिकेटपटूंनी याबाबत भूमिका घेतली आहे.

Wrestlers Protest News :
Prime Minister Narendra Modi : म्हणजे स्वप्नं विकणारे सेल्समन !

ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटूंशी ज्या पद्धतीने गैरवर्तन केले गेले आणि त्याचे व्हिडिओ समोर आले ते अस्वस्थ करणारे आहे, असे माजी क्रिकेटपटूंनी एक निवेदन जाहीर करत म्हंटले आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी 30 मे रोजी हरिद्वारमध्ये महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले आणि देशासाठी जिंकलेली पदके गंगेत बुडविण्याचा इशाराही दिला होता.

28 मे रोजी, परवानगीशिवाय नवीन संसद भवनाकडे आंदोलन करण्यासाठी दाखल होणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याबद्दल ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली. मात्र यादरम्यान पोलिसांनी कुस्तीपटूंची धरपकडची केली आणि पैलवानांना जंतरमंतरवर परत येऊ दिले जाणार नाही, असेही सांगितले.

Wrestlers Protest News :
Wrestlers Protest: राकेश टिकैत यांनी काढली कुस्तीपटूंची समजूत; सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टीमेटम

कुस्तीपटूंनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन क्रिकेटपटूंनी केले आहे. ते म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे त्यांच्या समस्या ऐकल्या जातील आणि पण घाईत त्यांनी काहीही करू नये. कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले. तर यावर माजी क्रिकेटपटू मदन लाल म्हणाले, 'त्यांनी पदके फेकून देण्याचा निर्णय घेतला हे हृदयद्रावक आहे. कारण पदक मिळवणे सोपे नसते. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी आमची मागणी आहे.

माजी खेळाडूंनी निवेदनात काय म्हंटलं ?

1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पाहून आम्ही दुःखी आणि व्यथित झालो आहोत. ते देशासाठी जिंकलेली पदके गंगा नदीत सोडून देण्याच्या विचारात आहेत.

याबद्दल आम्हाला चिंता वाटते. या पदकांमागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग, जिद्द आहे. ते केवळ त्यांचाच नाही तर देशाचा अभिमान आणि आनंद आहे. आम्ही त्यांना या प्रकरणी कोणताही घाईघाईने निर्णय न घेण्याचे आवाहन करतो आणि त्यांच्या तक्रारी लवकरात लवकर ऐकून त्यांचे निराकरण केले जाईल अशी आशा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com