धक्कादायक : ओवेसींच्या हत्या करून दोघांना बनायचा होतं हिंदुत्ववादी नेता!

एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हल्ल्याचा उलगडा झाला आहे.
Asaddudin Owaisi and Attackers
Asaddudin Owaisi and AttackersSarkarnama

लखनऊ : एमआयएमचे (AIMIM) सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हल्ल्याचा उलगडा झाला आहे. ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जवळ दोघांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसानी आरोपपत्र दाखल केले असून त्यातून धक्कादायक खुलासा झाला आहे.

हल्ल्यातून ओवेसी थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी सचिन आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आले आहे. ओवेसी यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, 'दोघांना मोठा हिंदुत्ववादी नेता बनायचे होते. ओवेसी यांची हत्या करून प्रसिध्द व्हायचे होते.' दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे.

Asaddudin Owaisi and Attackers
CBI च्या हाताला मोठं यश; फरार नीरव मोदीच्या सहकाऱ्याला इजिप्तमध्ये बेड्या

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सचिन आणि शुभमने जाती आणि धर्माच्या आधारावर देशात दोन्ही धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात खासदार किंवा अन्य कोणी जखमी जरी झाले असते तरी केवळ हापुड या भागातच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असती. एवढंच नाही तर या घटनेनंतर काही लोकांनी त्याचा वापर करून परिस्थिती आणखी खराब केली असती, असं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, हल्लातील मुख्य सुत्रधार सचिन (Sachin) ओवेसीचे भाषण ऐकून तो अस्वस्थ झाला होता. सचिनने त्याचा जवळचा मित्र शुभमसोबत (Shubham) ओवेसींच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. पण जेव्हा त्यांनी ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ओवेसी खाली वाकले. त्यांनी खाली गोळी झाडली आणि ते पळून गेले, असेही त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले.

Asaddudin Owaisi and Attackers
शशिकला यांना उच्च न्यायालयाचा झटका; पक्षात परतण्याच्या प्रयत्नांना खीळ

अनेक दिवसांपासून सचिन आणि शुभम यांची ओवेसींवर हल्ला करण्याची योजना करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ओवेसींची हालचालींवर सतत लक्ष ठेवून होते. त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळावी यासाठी सचिन आणि शुभम यांनी ओवेसींच्या अनेक सभांनाही हजेरी लावली होती. मात्र गर्दीमुळे त्यांना हल्ला करता आला नाही. ओवेसी मेरठहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ते ओवेसींच्या आधी टोलगेटवर पोहोचले. त्यांची गाडी येताच दोघांनीही त्यांच्या कारवर गोळीबार केला, असंही पोलीस चौकशीत स्पष्ट झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com