Women’s Commission : वडिलांनीच लैंगिक शोषण केलं; महिला आयोग अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ

Swati Maliwal : ''वडिलांनीच लहानपणी माझे लैंगिक शोषण केले...''
Swati Maliwal
Swati Maliwal Sarkarnama

Delhi News : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वाती मालिवाल यांनी वडिलांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

स्वाती मालिवाल माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ''मी लहान होते तेव्हा वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. वडिल मला मारहाण करायचे. त्यामुळे मी घाबरायचे आणि पलंगाखाली लपून बसायचे. ते घरी आले की भीती वाटायची. तेव्हा मी रात्र-रात्र विचार करायचे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना धडा शिकवाचा'', असं त्या म्हणाल्या.

Swati Maliwal
Hasan Mushrif News : साडेनऊतासांच्या चौकशीनंतर मुश्रीफांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश!

''मी लहान होते तेव्हा ते मला मारायचे. माझी वेणी ओढायचे. भिंतीवर डोकं आपटायचे. त्यामुळे मला दुखापत होऊन रक्तस्राव व्हायचा. मला खूपच वेदना व्हायच्या. अनेक जण असे आहेत, त्यांच्यासोबत देखील असंच घडलं असेल, त्यामुळे दुसऱ्यांच्या वेदना मी समजते. यामुळे अंतर्मन जागृत होतं आणि संपूर्ण व्यवस्था बदलून टाकते'', असं त्या यावेळी म्हणाल्या.

Swati Maliwal
Dhananjay Munde : तुम्ही मोठ्या नेत्या आहात..; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

दरम्यान, स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्षपद हे २०१५ पासून त्यांच्याकडेच आहे. मात्र, त्यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com