Dhananjay Munde : तुम्ही मोठ्या नेत्या आहात..; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

Pankaja Munde : धनंजय मुंडेंचं चॅलेंज पंकजा मुंडे स्वीकारणार का?
Pankaja Munde and Dhananjay Munde
Pankaja Munde and Dhananjay Munde Sarkarnama

Beed : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे नेहमीच एकमेकांवर टीका करताना पाहयला मिळतात.

आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या हे चॅलेंज स्वीकारतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

धनंजय मुंडे आज परळी वैजनाथ येथील एका सभेत बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, ''मी गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतोय. फुकटचा वारसा घेऊन सगळं त्याच्यावर असं नाही.

कारण माझ्या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे. सध्या जलजीवन मिशनवरून राजकारण सुरू आहे. पण त्या प्रकल्पाचा प्रस्ताव मी पालकमंत्री मांडला होता. या प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यता मी मंत्री असताना मिळवल्या'', असं ते म्हणाले.

Pankaja Munde and Dhananjay Munde
Manish Sisodia News : जेलमधून मनीष सिसोदिया यांचा केंद्राला इशारा : ‘साहेब मला तुरुंगात टाकून....’

''मी आणलेल्या प्रकल्पांचे भूमीपूजन तुम्ही करा. मात्र, चुकीची टीका करू नका. मी आपल्या मतदारसंघात एमआडीसी आणली. तुम्ही मोठ्या नेत्या आहात, माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. राज्यात आणि देशात तुमचं सरकार आहे''.

''देशातल्या मोठ्या सभागृहात देखील तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही आता एमआयडीसीमध्ये एक मोठा प्रकल्प आणा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही म्हणाल ते मी राजकारणात करायला तयार आहे. मी एमआयडीसी आणली आता तुम्ही उद्योग आणा'', असं थेट चॅलेंज धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com