Delhi Rain Update : पाण्यासाठी उपोषण करणाऱ्या मंत्र्यांच्या घरात घुसले पाणी; रेकॉर्डब्रेक पावसाने दाणादाण

Delhi Heavy Rain Delhi Water Minister Atishi AAP : दिल्लीच्या पाणीपुरवठा मंत्री अतिशी यांया घरात पाणी घुसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Delhi Rain, Atishi, Manish Tiwari
Delhi Rain, Atishi, Manish TiwariSarkarnama

New Delhi : राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. दिल्लीच्या पाणीपुरवठा मंत्री अतिशी यांच्यासह खासदारांच्या घरातही पाणी घुसले. अनेक भागात पाण्याची तळी साचल्याने दिल्लीकरांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले.

मागील काही दिवसांपासून दिल्लीकरांना पाण्यासाठी झगडावे लागत होते. त्यावरून अतिशी यांना चार दिवस उपोषणही केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मान्सूनच्या आगमनाने दिल्लीकरांना दिलासा दिला असला तरी त्रासच अधिक झाला.

अतिशी यांच्या घराबाहेर पाण्याचे तळे साचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांच्या घरातही पाणी घुसल्याचे सांगितले जात आहे. अतिशीप्रमाणे इतर काही नेत्यांचे व्हिडिओही समोर आले आहेत. काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनीही त्यांच्या घराबाहेर पावसाचे पाणी साठल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Delhi Rain, Atishi, Manish Tiwari
Parliament Session Update : तुम्ही यासाठी संसदेत आलाय का? सागरिका घोष यांच्यावर सभापती भडकले

एका हातात बॅग आणि एका हातात शूज घेऊन तिवारी पावसाच्या साठलेल्या पाण्यातून कारकडे जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ खासदार राम गोपाल यादव यांचाही एक व्हिडिओ सोशळ मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Delhi Rain, Atishi, Manish Tiwari
Parliament Session Live : दिल्लीत पावसाचा धुमाकूळ; संसदेतही धडकणार सरकारविरोधी वादळ

यादव यांच्या घराबाहेरही पाण्याचे तळे झाले आहे. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. राज्यसभेत अधिवेशनाला जाण्यासाठी ते निघाले असताना घरातील दोन कर्मचाऱ्यांनी हाताची झोळी करून यादवांना उचलून घेतले. या कर्मचाऱ्यांना त्यांना तसेच कारमध्ये बसवले. दिल्लीतील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, 1936 नंतर जून महिन्यात 24 तासांत पहिल्यांदाच सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 1936 मध्ये 28 जूनला 235.5 मिमी पाऊस पडला होता. दिल्लीमध्ये संपूर्ण जून महिन्यात सरासरी 80.6 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे 24 तासांतच तब्बल तिप्पट पाऊस झाल्याने शुक्रवारी सकाळी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com