Kapil Sibbal : केंद्र सरकार न्यायव्यवस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतयं; कपिल सिब्बलांचा थेट आरोप

पण उच्च न्यायव्यवस्थेतील नियुक्त्यांबाबत सरकारला अंतिम अधिकार नसल्याच्या वस्तुस्थितीशी ताळमेळ साधता आलेला नाही
Kapil Sibbal
Kapil Sibbal

Kapil Sibbal News : केंद्र सरकार न्यायव्यवस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केला आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासंबंधी (NJAC) नव्याने परीक्षण करण्यात यावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण केशवानंद भारती निकालाच्या मूलभूत रचनेचे तत्त्व सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे, असे सांगत कपिल सिब्बल (७४) यांनी या निकालात त्रुटी असल्याचे सरकारने खुलेपणाने सांगावे, असे आव्हान दिले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी यावर भाष्य केलं आहे. 'राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासंबंधी (NJAC)नव्याने परीक्षण करण्यासाठी सरकार अशी परिस्थिती निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण उच्च न्यायव्यवस्थेतील नियुक्त्यांबाबत सरकारला अंतिम अधिकार नसल्याच्या वस्तुस्थितीशी ताळमेळ साधता आलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

Kapil Sibbal
Uorfi Javed-Chitra Wagh : चित्रा वाघ पत्रकारावर भडकून म्हणाल्या, "उद्या तू अंतर्वस्त्रावर..."

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या टिप्पणीनंतर सिब्बल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी NJAC रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली होती. केशवानंद भारती खटल्यातील 1973 च्या ऐतिहासिक निकालावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने चुकीची उदाहरणे दिली. आणि संसद संविधानात दुरुस्ती करू शकते, परंतु त्याची मूलभूत रचनेत दुरुस्ती करु शकत नाही, यावरही त्यांनी आक्षेप घेतला होता.

सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये NJAC कायदा असंवैधानिक घोषित केला होता. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियम प्रणाली बदलणे हा या कायद्याचा उद्देश होता. धनखर यांच्या टीकेबद्दल विचारले असता सिब्बल म्हणाले, "जेव्हा उच्च घटनात्मक अधिकारी आणि कायद्याची जाण असलेली व्यक्ती अशी टिप्पणी करते, तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो की ते वैयक्तिक मत व्यक्त करत आहेत की सरकारच्या वतीने. त्यामुळे ते कोणत्या हेतूने बोलत आहेत हे मला माहीत नाही. पण सरकारला याची पुष्टी करावी लागेल, पण त्यांच्या मतांशी सहमत असल्याचे सरकारने जाहीरपणे सांगितले तर त्याचा वेगळा अर्थ निघतो, असे कपिल सिब्बल यांनी यावेळी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com