Politics : इंग्रजीत बोलणाऱ्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी भर सभेत झापलं; नेमकं काय घडलं?

Chief Minister : ''हे इंग्लंड नाही तर भारत आहे...''
CM Nitish Kumar
CM Nitish Kumar Sarkarnama

Nitish Kumar : इंग्रजीत बोलणाऱ्या एका शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी भर सभेत झापल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहार सरकारच्यावतीने मंगळवारी पाटण्यात शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंग्रजीत बोलणाऱ्या एका शेतकऱ्याला भर सभेत झापलं. ''हे इंग्लंड नाही तर भारत आहे, हिंदीत बोला'', असं म्हणत ते शेतकऱ्यावरच भडकले.

CM Nitish Kumar
Harshvardhan Jadhav News : पुन्हा माझ्या दारात येवू नका, हर्षवर्धन यांची आगपाखड..

नेमकं काय घडलं?

बिहार सरकारच्यावतीने पाटणामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बिहार सरकार लवकरच राज्यात कृषी रोड मॅप लागू करणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. तसेच राज्यातील विविध भागातून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.

यावेळी काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रश्न विचारले. त्यावर मुख्यमंत्री उत्तर देत होते. मात्र, एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट इंग्रजीत प्रश्न विचारला. त्यानंतर मात्र, इंग्रजीत प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला नितीश कुमार यांनी भर सभेत झापलं.

CM Nitish Kumar
Sharad Pawar On BJP: लोकशाहीत सत्ता येते-जाते; सत्तेचे गुण-दोष सांगत पवारांचा भाजपला टोला

''हे इंग्लंड नाही तर भारत आहे, तुम्ही हिंदीत बोलायला पाहिजे. इथे आलेले शेतकरी हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना इंग्रजी कसं कळणार?'', असं म्हणत त्यांनी त्या शेतकऱ्यालाच भर सभेतच सुनावलं.

''कोरोना आल्यापासून लोकं आपली मातृभाषा आणि राज्यभाषा विसरत चालले आहेत. प्रत्येकजण आता इंग्रजीचा वापर करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी इंग्रजीची गरज आहे तिथे इंग्रजीचा वापर व्हायला हवा. पण येथे शेती संदर्भात चर्चा होत आहे तर ती आपल्या मातृभाषेत व्हायला हवी'', असंही ते यावेळी म्हणाले.

CM Nitish Kumar
Chinchwad By-Election : पिंपरी-चिंचवडमध्ये 'वंचित' फुटली : शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल!

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंग्रजीत बोलणाऱ्या एका शेतकऱ्याला भर सभेत झापल्यामुळे या प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर सोशल मीडियावर नेटिझन्स यावर वेगवेगळी टिप्पणी देखील करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com