Chinchwad By-Election : पिंपरी-चिंचवडमध्ये 'वंचित' फुटली : शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल!

Vanchit bahujan Aghadi : शहर वंचितची दाणादाण उडाली..
Chinchwad By-Election
Chinchwad By-Election Sarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-Election : वंचित बहूजन आघा़डी`त पिंपरी-चिंचवडमध्ये फूट पडली. वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, पदाधिकारी,कार्यकर्ते अशा अंदाजे शंभर जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील रावेत येथे प्रवेश पार पडला. यामुळे शहर वंचितला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.

Chinchwad By-Election
Swabhimani Sanghatna Andolan : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानीने रोखला महामार्ग...

तायडे व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना फायदा होणार आहे, तर अपक्ष ठाकरे शिवसेना बंडखोर राहूल कलाटे यांना धक्का बसला आहे. कारण `वंचित`ने कलाटेंना पाठिंबा जाहीर केलेला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे शिवसेनेबरोबर युती असूनही त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या बंडखोराला चिंचवडमध्ये पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

Chinchwad By-Election
Sharad Pawar On BJP: लोकशाहीत सत्ता येते-जाते; सत्तेचे गुण-दोष सांगत पवारांचा भाजपला टोला

काटे यांच्या प्रचारार्थ पवार चिंचवडमध्ये आलेले आहेत. रावेत येथील त्यांच्या सभेत तायडे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला रोखण्यासाठी तसेच महाविकास आघाडीला मदत व्हावी म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे तायडे यांनी त्यानंतर `सरकारनामा`ला सांगितले.

कलाटेंना नाही, तर आघाडीला पाठिंबा द्यावा, अशी शहरातील बहूतांश पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण, ती डावलून कलाटेंना समर्थन देण्यात आल्याने आम्ही दुखावलो होतो. मानसन्मान मिळत नसेल, तर पक्षाचा काय उपयोग, म्हणून तो सोडला, असे ते म्हणाले. दरम्यान, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी तायडेंचा राजीनामा लगेच आजच मंजूर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com