Pune News : पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि युतीचे बडे नेते सहभागी होत आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवडमधील वातावरण ढवळले आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांनीही कधी नव्हे ते पोटनिवडणुकीतील प्रचारात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी अडचणीच्या काळात चिंचवडकरांनी मला मदत केली. त्यामुळे पोटनिवडणुकीत सहभागी झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी देशात आणि राज्यात असलेल्या भाजपलाही टोला लगावला आहे.
यावेळी पवार Sharad Pawar म्हणाले की, "पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहराचा जो काही विकास झाला आहे, त्याचे खरे श्रेय यशवंतराव चव्हाण (Yashawantrao Chavan) यांना जाते. या शहरातील महानगरपालिकेची सत्ता जनतेने अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना दिली. त्या सत्तेच्या माध्यमातून येथील पदाधिकाऱ्यांनी, तत्कालीन अधिकाऱ्यांनी येथे अनेक उत्तम कामे केली. त्यामुळेच या शहराचे नाव देशात गाजत आहे."
येथील विकासाबाबत पवार म्हणाले की, "पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी सत्तेत असताना अनेक निर्णय घेतले. या भागात औद्योगिकीकरण करण्यात आले. तेथील कामगारांना चांगले वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला. त्यातून चाकण, रांजणगाव, शिरवळ, जेजुरी, बारामती, इंदापूर, तळेगाव एमआयडीसी उदयास आल्या."
यानंतर त्यांनी भाजपला चिमटाही घेतली. ते म्हणाले, "अशी काही विकासाची धोरणे कधी भाजपने आखली नव्हती. भाजपच्या डोक्यात विकासाचा मुद्दा येत नाही. ते कधी विकासाबाबत सांगत नसतात. भाषणं चांगले देतील."
पवार यांनी सांगितले की, "पिंपरी-चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला शहरातील विकास पाहून महानगरपालिकेची अनेक वर्षे सत्ता दिली. २०१७ मध्ये मात्र राष्ट्रवादीची सत्ता काढून भाजपला दिली. सत्ता चमत्कारीक असते. ती येते-जाते. सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरावी लागते."
शरद पवारांनी सत्तेची काही गुण-दोष सांगितले. हे सांगताना त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. पवार म्हणाले, "महानगरपालिकेतून मधल्या काळात सत्ता गेली. सत्ता लोकांसाठी वापरावी लागते. सत्ता चमत्कारीत असते. लोकशाहीतील सत्तेचे काही दोष आणि गूण असतात. सत्ता केंद्रीत झाली की भ्रष्ट होते. अधिक लोकांच्या हातात दिली की सत्ता राहते. आणि आता सत्ता केंद्रीत झाली आहे."
यानंतर पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील स्थितीबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, "सत्ता लोकांसाठी वापरायची असते, याचा विसर पडल्याचे दिसत आहे. आता काही जण तक्रार करतात की शहराचे दोन भाग झाले आहे. एक नदीच्या अलिकडे आणि दुसरा नदीच्या पलिकडे. हा काय प्रकार, माझ्या लक्षात आला नाही. ज्या ठिकणच्या जनतेने मला चारवेळा लोकसभेत पाठवले. ज्यांच्यामुळे देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्या भागाची झालेली अवस्था पाहून अस्वस्थ होते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.