MP Sanjay Singh : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण; खासदार संजय सिंहांच्या ईडी कोठडीत वाढ

Delhi Liquor Scam: संजय सिंह यांनी ईडीवर गंभीर आरोप करत 'मला वर पाठवण्याची तयारी होती', असे म्हटले आहे.
MP Sanjay Singh
MP Sanjay Singh Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर मंगळवारी संजय सिंह यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आणखी तीन दिवसांच्या कोठडीत वाढ केली.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या निवासस्थानावर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. तसेच त्यांची तब्बल 10 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाची गेल्या एक वर्षापासून तपास यत्रणांकडून छापेमारी सुरू आहे.

MP Sanjay Singh
Amanatullah Khan ED Raid : संजय सिंहांच्या अटकेनंतर 'आप'वर नवं संकट; आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी!

याच प्रकरणात 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. ते अद्याप तुरुंगातच आहेत. त्यानंतर याच प्रकरणात संजय सिंहांना अटक झाली. आता संजय सिंह यांना आणखी पाच दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली. यावेळी खासदार संजय सिंह यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.

संजय सिंह यांनी ईडीवर गंभीर आरोप केले ?

संजय सिंह यांनी ईडीवर गंभीर आरोप करत 'मला वर पाठवण्याची तयारी होती', असे म्हटले आहे. "रात्री साडेदहा वाजता ईडीकडून बाहेर नेण्यात येते. तसेच मी विचारल्यावर मला तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेण्यात येणार असल्याचे सांगितले. पण न्यायाधीशांची परवानगी आहे का ? असे विचारले असता माझ्याकडूनच लेखी घेण्यात आली. न्यायाधीश साहेब, त्यांना विचारा कुणाच्या सांगण्यावरून मला वर पाठवायची तयारी होती, माझी एकच विनंती असून मला कुठेही नेतांना न्यायाधीशांना याची माहिती असावी", असे खासदार संजय सिंह म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

MP Sanjay Singh
MLA Dhangekar Visit Sasoon Hospital : आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर भडकले; नेमकं काय घडलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com