MLA Dhangekar Visit Sasoon Hospital : आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर भडकले; नेमकं काय घडलं ?

MLA Ravindra Dhangekar : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने धंगेकर चांगलेच संतापले.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. याच प्रकरणावरून आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ललित पाटील प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी धंगेकरांनी केली. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने धंगेकर चांगलेच संतापले.

MLA Ravindra Dhangekar
Sushma Andhare On Bhuse : ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री भुसेंचा फोन; अंधारेंचा गंभीर आरोप

अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. यावेळी धंगेकरांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्याकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली.

याबरोबरच ललित पाटीलने रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती देखील त्यांनी यावेळी विचारली. आरोपी पाटील याला कुठले आजार होते, त्याच्यावर नऊ महिने कोणते उपचार करण्यात आले ? याबद्दलची चौकशी धंगेकर यांनी यावेळी केली.

MLA Ravindra Dhangekar
Sasoon Drug Racket : 'ड्रग्ज रॅकेट' प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश; ललित पाटीलच्या भावाला वाराणसीमधून उचललं

तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल न करण्याचे कारणही धंगेकर यांनी अधिष्ठाता यांना विचारले. पण यावर अधिष्ठाता डॉ.ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे रुग्णावर कुठले उपचार सुरू आहेत, याबाबत कायद्याने माहिती देता येऊ शकत नाही, असे कारण अधिष्ठाता यांनी धंगेकरांना सांगितले.

त्यांच्या या उत्तरामुळे धंगेकर चांगलेच संतापले. त्यानंतर या प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

'अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार...'

ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या प्रकरणारून आता आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले. "ससून रुग्णालयावर राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. पण या ठिकाणी गुन्हेगारांना व्हीआयपी उपचार आणि सर्वसामान्य रुग्णांना त्रास दिला जातो, असा आरोप करत ललित पाटील प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा", अशी मागणी त्यांनी केली. तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहे", असे धंगेकर म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

MLA Ravindra Dhangekar
Beed District Cooperative Bank : बीड जिल्हा बँकेच्या कर्ज मागणीच्या प्रस्तावाकडे सरकारचा कानाडोळा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com