Atique Ahmad Murder : कर्माची फळे, नववधूचा शाप खरा ठरला: काय घडलं होतं १८ वर्षांपुर्वी?

२००५ ची ही घटना, तेव्हाच्या इलाहाबादमध्ये पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली होती
Atique Ahmed news:
Atique Ahmed news:Sarkarnama

Atique Ahmad Murder Case Update: कुख्यात गुंड आतिक अहमद (Atique Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी (१५ एप्रिल) प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलबाहेर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेमुळे प्रयाग) राजमध्ये तणावाचे वातावरण आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या उमेश पाल हत्याकांडात अतिक आणि अशरफ मुख्य आरोपी होते. उमेश पाल यांच्या हत्येनंतर अवघ्या 52 दिवसांत या हत्या प्रकरणातील सहा आरोपी मारले गेले.पण या घटनेनंतर प्रयागराजमध्ये एकच चर्चा सुरु आहे. आणि ती म्हणजे एक नववधूचा शाप खरा ठरला. (The Curse of the Bride Comes True: What Happened 18 Years Ago)

कोण होते उमेश पाल नक्की काय घडलं होतं तेव्हा?

24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या धुमनगंज भागात वकील उमेश पाल यांच्यावर भरदिवसा बॉम्ब आणि गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. यादरम्यान उमेश पाल यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांचाही मृत्यू झाला. उमेश पाल 2005च्या आमदार राजू पाल खून खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार होता. उमेश पालची पत्नी जया पाल हिच्या तक्रारीवर पोलिसांनी अतिक अहमद, अशरफ, अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, अतिकची दोन मुले, सहकारी गुड्डू मुस्लिम, गुलाम आणि इतर 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या खटल्यात अतिक आणि अशरफ यांना मुख्य आरोपी करण्यात आले. (Atique Ahmad Murder Case)

Atique Ahmed news:
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

2005 मध्ये झाली होती राजू पाल यांची हत्या

२००५ ची ही घटना, तेव्हाच्या इलाहाबादमध्ये पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागील होती. अतिकने त्याचा भाऊ अशरफला या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. तर अशरफच्या विरोधात बसपाचे राजू पाल निवडणुकीच्या रिंगणात होते.राजू पाल यांनी ही विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली आणि त्यानंतर काहीच दिवसांत राजू पाल यांचा विवाह पूजा यांच्याशी झाला.

पण दुसरीकडे परभावाची सल आतिक आणि अशरफला स्वस्थ बसू देत नव्हती. दोघा भावांनी राजू पाल यांची हत्या करण्याचा प्लॅन आखला. २५ जानेवारी २००५ रोजी धूमनगंजमध्ये राजू पालवर आतिक आणि अशरफ यांच्या गुंडांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.या घटनेने संपूर्ण इलाहाबाद हादरून गेलं होते. राजू पाली आणि पूजा पाल यांच्या लग्नाच्या अवघ्या नवव्या दिवशी राजू यांची हत्या करण्यात आली.

Atique Ahmed news:
Atique Ahmad News: आतिकला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती; 28 मार्चला काय घडलं होतं...?

त्याच दिवशी पूजा यांनी अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता.माझ्या पतीला जसे मरण आले तसे एक ना एक दिवस देव त्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ देईल, असा संताप पूजा पाल यांनी व्यक्त केला होता. या घटने नंतर तब्बल १८ वर्षानी शनिवारी रात्री आतिक आणि अशरफ यांचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला. आतिक आणि अशरफच्या मृत्यूनंतर पूजा पाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.जो जसा करतो तसेच त्यालाही मिळते. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. माणसाला त्याच्या कर्माची फळे इथेच भोगून जावी लागतात, अशी प्रतिक्रिया पूजा पाल यांनी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com