Atique Ahmed Died : मुलाशेजारीच बापाची खोदली जाणार कबर

UP Police Alert : शाइस्ताला अटक करण्यासाठी पोलीस सतर्क
Asad Ahmed, Atique Ahmed
Asad Ahmed, Atique AhmedSarkarnama
Published on
Updated on

UP Govt and Umesh Pal Case : अतीक अहमद आणि अशरफ यांच्या मृतदेहावर आजच (रविवारी) अंत्यविधी करण्याच्या निर्णय योगी सरकारने घेतला आहे. यापूर्वी अतीकच्या मुलगा असद याचा मृतदेह ज्या कबरीस्तानात पुरला तेथेच शेजारी अतीक आणि अशरफ यांचे मृतदेह दफनविधी करण्यात येणार आहेत. दरम्यान, पतीच्या दफनविधीसाठी शाइस्ता उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यूपी पोलिसांना उमेश पाल हत्याकांडाप्रकरणी अतीकची पत्नी शाइस्ता परवीन हवी आहे. सध्या ती फरार असून तिच्यावर सरकारने ५० हजारांचा इनाम जाहीर केलेला आहे. दरम्यान, शाइस्ता आपल्या मुलाच्या असदच्या दफनविधीसाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे पोलीसह सतर्क होते. मात्र ती आली नाही. आता ती पती अतीकच्या दफनविधीसाठी येणार असल्याची माहिती आहे.

Asad Ahmed, Atique Ahmed
Atique Ahmed news : हल्ल्यापूर्वी अतिकने सांगितली १४ जणांची नावे : पाकिस्तानमधून शस्त्रे पुरविणारी 'ती' व्यक्ती कोण?

सध्या शाइस्ता फरार आहे तर अतीकचे दोन मुले उमर आणि अली हे तुरुंगात आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांवर पोलिसांचे लक्ष आहे. उमेश पाल आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांची २४ फेब्रुवारी रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील अतीकसह सहा आरोपींना मारण्यात आले. त्यापूर्वी त्याचा मुलगा असद, त्याचे सहकारी अरबाज, विजय चौधरी, गुलाम हसन यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.

अतीक आणि अशरफ यांना शनिवारी रात्री उशिरा प्रयागराज येथे गोळ्या घालून ठार करण्यात आले. पोलीस त्या दोघांना आरोग्य तपासणी करण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. यात अतीक आणि अशरफ यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.

Asad Ahmed, Atique Ahmed
Atiq Ahmed Murder : दफनविधीपूर्वी शाईस्ताला पाहायचाय अतिक-अशरफचा चेहरा? आत्मसमर्पणाची तयारी?

दरम्यान, उमेश पाल हत्याकांडांतील पहिला एन्काउंटर २७ फेब्रुवारी रोजी प्रयागराज (Uttar Pradesh) येथे केला होता. त्यानंतर ६ मार्च रोजी उस्मान याला पोलिसांनी कंठस्नान घातले. १३ एप्रिल रोजी अतीकचा मुलगा असद आणि त्याचा मित्र गुलाम यांचा झांशीमध्ये एन्काउंटर करण्यात आला. तत्पुर्वीच अतीकने आपल्या जीवाला धोका असून सुरक्षा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचाही शनिवारी रात्री खून झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com