PM Narendra Modi : मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा आकडा अडीचशे कोटींच्या पुढे

Foreign Expense of PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची कायम चर्चा होतच असते.
Expenses of PM Modi's foreign Visit:
Expenses of PM Modi's foreign Visit: Sarkarnama
Published on
Updated on

Delhi New : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची कायम चर्चा होतच असते. आता त्यात या दौऱ्यांच्या खर्चाच्या आकड्यांचीही भर पडली असून, गेल्या चार वर्षांत मोदींच्या दौऱ्यांवर तब्बल २५४ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. विशेष म्हणजे, या खर्चाच्या रकमेचे आकडे मोदी सरकारमधील परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत सगळ्यांपुढे मांडली. आधीच मोदींच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून टीका-टिपण्णी होत असतानाच या आकड्यांनी विरोधकांच्या टीकेला धार चढण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र धोरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निरनिराळ्या देशात जाऊन मैत्रीचे नाते वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय कार्यक्रम, परिषदांसाठीही ते परदेश दौरे करतात. मात्र मोदींच्या परदेश वारीवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येते. याच मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत लेखी प्रश्न विचारून दौऱ्यांची माहिती घेतली. त्यानुसार, पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्मनंतरचा म्हणजेच 2019 ते जुलै 2023 या कालावधीत मोदींनी 52 परदेश दौरे केले. त्यात एकूण 59 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यावरचा सुमारे २५४ कोटी ८७ लाख रुपये खर्च केल्याचे मुरलीधरन यांनी राज्यसभेत आपल्या खुलाशात स्पष्ट केले.

Expenses of PM Modi's foreign Visit:
CM Shinde Delhi Visit: इर्शाळवाडीची घटना ऐकून मोदीही हळहळले; दिल्लीत मोदी-शिंदेंच्या भेटीत दुर्घटनेवर चर्चा

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाबाबत राज्यसभेत लेखी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना 21 फेब्रुवारी 2019 ते 16 नोव्हेंबर 2022 यादरम्यान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 22 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली.

तसेच, राष्ट्रपतींच्या दौऱ्यांसाठी केंद्र सरकारने तब्बल 6,24,31,424 रुपये खर्च केले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यांसाठी 22,76,76,934 रुपये आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी 20,87,01,475 रुपये खर्च केल्याची माहितीही मुरलीधरन यांनी दिली.

Expenses of PM Modi's foreign Visit:
Pune News : इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले; करुन दिली भोर, वेल्हे, मुळशीची आठवण...

लिखित उत्तरात मोदींनी या काळात भेट दिलेल्या २१ देशांच्या यादीचाही समावेश आहे. सीपीआय(एम) खासदार व्ही. शिवदासन यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना मुरलीधरन म्हणाले, "फेब्रुवारी 2021 ते जून 2023 या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 30,80,47,075 रुपये खर्च झाले आहेत." मंत्रालयाच्या उत्तरात या कालावधीत पंतप्रधानांच्या 20 परदेश दौऱ्यांची यादी देखील आहे. फेब्रुवारी 2021 ते जून 2023 या कालावधीत मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 30 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला. म्हणजेच,फेब्रुवारी 2019 ते जून 2023 या कालावधीत मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com